पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने अशीच व्याख्या आपल्या शिष्यांपुढे मांडली होती. तत्कालीन हिंदू समाजातील जातिव्यवस्थेवर चर्चा चाललेली असताना एका शिष्याने प्रश्न विचारला की निसर्गात प्राणिमात्रांच्या जाती नाहीत काय ? कुत्रा, मांजर, गाय, वाघ, सिंह यांच्यातही फरक आहेत. मग मानवी समाजातील फरकांचा अधिक्षेप का करावा ? यावर गौतमबुद्धाने उत्तर दिले, की वेगवेगळ्या प्राण्याच्या परस्पर संबंधातून नवा जीव निर्माण होऊ शकत नाही. सबब त्या खन्या जाती आहेत. उलट मानवी समाजातील जाती या अवास्तव आहेत.

 १८६५ साली मेंडेलने अनुवांशिकतेची जी मांडणी केली ती पूर्वीपेक्षा अधिक नेमकी, अधिक गणिती पद्धतीची, संभाव्यतेचे आणि संख्याशास्त्राचे मूलसिद्धांत वापरणारी होती. तेव्हापासून या शास्त्रात गणित आणि संख्याशास्त्राला पक्के स्थान मिळाले. रोनाल्ड फिशर, जे. बी. एस. हाल्डेन यांच्यासारखी गणितीमंडळी या शास्त्रात अपरंपार लौकिक मिळवून गेली आणि मोलाची भर टाकू शकली. मेंडेल स्वतः गणिताचा पदवीधारक होता. त्यामुळेच त्याला आपल्या निरीक्षणाचे नीट. विश्लेषण करता आले असे अनेकांना वाटते. मेंडेलला बागकामाची आवड होती. आपल्या अभ्यासाकरता त्याने तऱ्हेतऱ्हेच्या घेवडयाचे बी घेतले. काही बियांचे आवरण गुळगुळीत, तर काहींचे सुरकुतलेले, दोन्हीची रोपे त्याने वाढवली. पहिल्या प्रकारच्या फुलातले परागकण दुसऱ्या प्रकारच्या फुलांवरील स्त्रीकेसरांवर टाकले. हा झाला गुळगुळीत आणि सुरकुतलेल्या घेवड्यांचा संकर यातून घेवड्याच्या शेंगा मिळाल्या. यांना पहिली पिढी (F1 ) म्हणतात. पण या सर्व शेंगांमधील दाणे गुळ- गुळीत आवरणाचे होते. मग सुरकुतलेपणाचा गुणधर्म कुठे लुप्त झाला ? पहिल्या पिढीतल्या बिया पेरून दुसरी (F2) पिढी तयार झाली. यातला चौथा हिस्सा बिया सुरकुतलेल्या होत्या. अशा निरीक्षणांचे स्पष्टीकरण देण्याकरता मैडेलने आपले सिद्धांत मांडले. तो म्हणाला, गुणधर्म लोपत नाहीत. नुसते लपतात. संधी मिळाली की, पुन्हा उसळून येतात. पिल्लाला प्रत्येक गुणधर्म जोडीने मिळतो. एक आईकडून आणि एक बापाकडून. दोन्ही सारखेच असले तर प्रश्नच मिटला. उंच रोपाचा परागकण उंचरोपाच्या फुलावर पडला तर उंचपणाचा डबलडोस दाण्याला मिळणार. पण आई आणि बापा- कडून मिळणाऱ्या गुणधर्मात विरोध असला तर ? एकाची सरशी होते, त्याला डॉमिनंट

३० / नराचा नारायण