पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण तिसरे


घेवडे, घुंगुरटी आणि घोटाळे


 उत्क्रांतिवादाची मांडणी करताना डार्विनला दोन कोडी उलगडता आली नाहीत. एकाच जातीच्या प्राण्यांमध्ये फरक असतात आणि जे फरक परिस्थितीला अनुकूल असतात त्यांचा प्रसार होतो हे खरे. पण मुळात हे फरक कसे निर्माण होतात ? आणि पुढच्या पिढीला कसे दिले जातात ? पहिल्या प्रश्नावर डार्विनला फ्रेंच शास्त्रज्ञ लमार्क याने दिलेले उत्तर बरचसे पटले. ज्या अवयवांचा वापर भरपूर, ते चांगले रेखीव, विकसित होतात. ज्यांचा वापर होत नाही ते खुरटून जातात. म्हणजे पैल- वानांचे दंड तगडे, तर रानोमाळ भटकणाऱ्या धनगरांच्या पिंढऱ्या पक्क्या उंचावरची पाने खायला धडपडणाऱ्या जिराफाची मान लांब. वरवर हे पटण्यासारखे आहे. पण लमार्कने ज्यांच्यासाठी स्पष्टीकरण दिले. त्यातले बरेचसे फरक परिस्थितिजन्य होते. पैलवानाला नाद लागले आणि हौद्यात घुमणे थांबले तर दंड ओसरतील की नाही ? दहा वर्षे सतत बस आणि रिक्षाने फिरणारा धनगर पुन्हा दिवसाला वीस मैल न

२८ / नराचा नारायणं