पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डार्विनचा बुलडॉग म्हणून प्रसिद्ध असलेला तरुण शास्त्रज्ञ टॉमस हक्सले, डार्वि- नच्या विरोधकांवर व्याख्याने आणि लिखाण यांतून घणाघाती हल्ले करत असे. १८८८ साली लंडनमधल्या 'नाइन्टीन्थ सैचरी' या फार प्रतिष्ठित मासिकात त्याने 3 'स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स' या शीर्षकाचा एक निबंध लिहिला. तो फार वाचला आणि चर्चिला गेला. त्यात हक्सलेने प्रतिपादन केले की, प्राणिसृष्टीत सततच जगण्या- करता झगडा चालू असतो. तो निसर्गनियमच आहे. उत्क्रांती घडवून आणणारी तीच शक्ती आहे. या द्वंद्वयुद्धामधे शक्तिमान, चपळ आणि धूर्त प्राणीच टिकतो. पुढच्या द्वंद्वात उतरण्यासाठी हक्सलेच्या या मांडणीमुळे अनेक चिंतक बेचैन झाले. त्यांच्यापैकी एक होता पीटर क्रोपॉटकिन. त्याच्या अनुभवाचे, व्यासंगाचे व तत्त्व- ज्ञानाचे सार याच्या नेमके उलट होते. त्याने हक्सलेला १८९० ते १८९६ या काळात एका लेखमालेतून उत्तर दिले. 'म्यूचुअल एड : ए फॅक्टर इन इव्होल्यूशन ' किंवा 'सहकार : उत्क्रांतीचे एक कारण' या नावाने ही लेखमाला पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली आहे.

 प्रिन्स पीटर क्रोपॉटकिनचे उत्क्रांतिविषयक विचार सांगण्यापूर्वी त्याच्या जीवनाचा काहीसा अद्भुत आलेख थोडक्यात मांडतो. रशियन उमराव घराण्यात जन्मलेला हा तरुण त्यावेळच्या रीतीनुसार लष्करी अकादमीमध्ये शिकायला गेला आणि अतिशय उत्तम क्रमांकाने पास झाला. त्यामुळे त्याला लष्कराच्या हव्या त्या पलट- णीत जाता आले असते. सर्वात मानाची पलटण म्हणजे रशियाच्या झार बादशहाची अंगरक्षक पलटण. तिच्याऐवजी जिथे शिक्षा म्हणून पाठवतात, त्या सायबेरियातील पलटणीत जाण्याचे कोपॉटकिनने ठरवले. तेथील काळात त्याने सायबेरियातील प्राणि- जीवन, समाजजीवन आणि भूगोल यांचा खोल अभ्यास केला. त्याच्या वैज्ञानिक लिखाणामुळे त्याला वयाच्या २९ व्या वर्षी म्हणजे १८७१ साली शाही भूगोल- संसदेचे सन्मान्य चिटणीसपद देऊ करण्यात आले. पण हा बहुमान क्रोपॉटकिन ने नाकारला. यावेळेपर्यंत त्याची दृष्टी बदलली होती. तो आता अॅनार्किस्ट किंवा मुक्तिवादी झाला होता. जनसामान्यांच्या भल्याकरता प्रस्थापितांशी झगडा देण्यात तो जीवन वेचणार होता. १८७२ साली 'चेकोव्हस्की गट' नावाच्या झारविरोधी संघटनेत काम करण्याबद्दल त्याला तुरुंगात टाकण्यात आले. दोन वर्षांनी तो पश्चिम

२२ / नराचा नारायण