पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरजेच्या वस्तू इतरांकडून मिळवता यायला हव्यात. यासाठी अनिर्बंध व्यापार आणि अनिर्बंध अर्थव्यवहाराची संधी हवी. सरकारे यात हस्तक्षेप करतील, तर समाजाचे नुकसानच होईल.
 अॅडम स्मिथनंतर अर्थशास्त्राच्या विचारधारेमधे महत्त्वाची भर घालणाय्या दोन प्रसिद्ध ब्रिटिश व्यक्ती म्हणजे टॉमस माल्यस आणि डेव्हिड रिकार्डे, माल्यसच्या हिशेबाप्रमाणे लोकसंख्या भूमितिश्रेणीत किंवा पटीत वाढते तर अन्नोत्पादन गणित श्रेणीत ( एकाचे दोन, दोनाचे तीन, तीनाचे चार वगैरे ) वाढते. या शर्यतीत अन्नो- त्पादन मागे पडते आणि भूकबळी पडू लागतात. माल्यसचे लिखाण वाचून रिकार्डोला एकदम प्रकाश दिसला. निसर्गातील स्पर्धेचे मूळ मर्यादित साधनसंपत्तीत आहे हे त्याच्या ध्यानात आले.
 डेव्हिड रिकार्डीने प्रतिपादन केले, की लोकसंख्यावाढीमुळे कामगारांमधे रोज- गारासाठी स्पर्धा सुरू होऊन कमी रोजंदारीवर मजूर मिळतील. मजुरीचे दर किती खाली जाऊ शकतील? तर जगण्याच्या किमान गरजेपर्यंत त्याहून कमी मजुरी मिळाली तर उपासमारीने कामगार मरतीलच. यावरून कोणाला असे वाटेल की, कामगारांना या केविलवाण्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करून मालकांना जास्त मजुरी द्यायला भाग पाडायला हवे. डेव्हिड रिकार्डोने बजावले की, या हस्तक्षेपाचा उपयोग होणार नाही. मजुरी वाढली, की कामगारांची कुटुंबे मोठी होतील. संख्या वाढेल. अशी मजुरांची संख्या गरजेपेक्षा जास्त वाढली की, मजुरीचे दर आपोआप खाली येतील. अॅडम स्मिथच्या दृष्टीने स्पर्धात्मक व्यवस्थेमधे उज्ज्वल उद्याची बीजे होती. तर रिकार्डोच्या मते स्पर्धेमुळे कामगार कायमचे दारिद्र्यात खितपत पडणार होते. आणि याला कोणताही उपाय नव्हता.
 स्पर्धात्मक व्यवस्थेवर स्पेन्सरचे भाष्य या सर्वांहून वेगळे होते. समाजात विषमता का ? काही लोक गरीब आणि काही श्रीमंत का ? याला स्पेन्सरचे उत्तर म्हणजे हा नॅचरल सिलेक्शनचा परिपाक आहे. दुबळे, मागास, मूर्ख लोक कंगाल राहिले. नैसर्गिक झगड्यात हरले. शक्तिवान्, बुद्धिमान्, कर्तृत्ववान होते ते श्रीमंत झाले. हा निसर्गनियमच आहे. मुंगीपासून माकडापर्यंत जो नियम लागू तोच माणसाला.

 श्रीमंतांची अशी तरफदारी स्पेन्सरपूर्वी कोणी केली नव्हती. साहजिकच तो

२० / नराया नारायण