पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तात की, विद्यार्थ्यांना तो बायबलमधला भाग शिकू देत. मग त्याचा अंतर्विरोध, भाबडेपणा, फोलपणा त्यांना आपसूक जाणवेल आणि उत्क्रांतिवादाची सत्यता त्यांना पटेल. कोणी म्हणतात की, विद्यार्थी आपापला निर्णय चिकित्सक बुद्धीने घेऊ शकत नाहीत. बहुतेक शिक्षकांनासुद्धा पुस्तकातील गोष्टींची फारशी चिकित्सा करता येत नाही. या सर्वांची इच्छा, तज्ञांनी नीरक्षीरविवेक करून शेवटी निर्णय त्यांच्यापर्यंत पोचवावा अशीच असते.
 धर्ममार्तंडांनी उत्क्रांतिवादाविरुद्ध उघडच आघाडी उघडली होती. पण काही सामाजिक अभ्यासक स्वतःला डार्विनवादी म्हणवत, उत्क्रांतिवादाच्या नावावर आपल्या आवडत्या कल्पना खपवू पाहत. मला इथे हर्बर्ट स्पेन्सरचे लिखाण अभिप्रेत आहे. सहयव्हल ऑफ द फिटेस्ट हा वाक्प्रचार उत्क्रांतिवादाशी घट्ट चिकटलेला आहे. पण तो डार्विनने नव्हे, तर स्पेन्सरने लोकप्रिय केला. स्पेन्सर मुळात रेल्वे इंजिनिअर होता. पण उत्तरायुष्यात तो लेखक, वक्ता, प्रकांडपंडित, समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ म्हणून विख्यात झाला. त्याच्या पुस्तकांचा खपही खूप होता. १९०० साला- पर्यंत त्याच्या 'स्टडी ऑफ सोशिऑलॉजी' या ग्रंथाच्या सुमारे वीस हजार प्रती खपल्या होत्या तर ' एज्युकेशन' या ग्रंथाच्या पन्नास हजार. हे झाले इंग्लंडमधले आकडे. अमेरिकेत १९०० सालपर्यंत त्याच्या सर्व ग्रंथांच्या मिळून ३,६८,७५५ प्रती खपल्या होत्या. अर्थात यांतल्या काही प्रती तरी श्रीमंतांनी केवळ फॅशन म्हणून विकत घेतल्या असणार. त्याचप्रमाणे सगळीच पुस्तके सारखीच वाचली गेली असेही नाही. पीटर मेडावार या आजच्या आघाडीच्या. ब्रिटिश जीवशास्त्रज्ञाने सांगितलेली एक आठवण ऐकण्याजोगी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात स्पेन्सर- स्मृति- व्याख्यान- माला देण्यासाठी तयारी म्हणून स्पेन्सरचे लिखाण पाहताना लक्षात आले, की रॉयल सोसायटीच्या ग्रंथालयातील स्पेन्सरचे 'प्रिन्सिपल्स ऑफ बायॉलॉजी' हे पुस्तक ग्रंथालयाने विकत घेतल्यापासून एकाही वाचकाने वाचलेले नव्हते. बरीच पाने चक्क एकमेकाला चिकटलेली होती.

 स्पेन्सरने उत्क्रांतिवादाचे तत्व अगदी सार्वत्रिक करून टाकले. विश्व उत्क्रांत होत आहे, सूर्यमंडळ आणि पृथ्वी उत्क्रांत होत आहेत. गर्भापासून बालक निर्माण होते सुद्धा उत्क्रांती. समाजसुद्धा एखाद्या जीवासारखा उत्क्रांत होत असतो. माणसाचे

१८ / नराचा नारायण