पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समर्थकांना आशा होती, की विक्रमसिंघेच्या साक्षीमुळे त्यांना आधार मिळेल. पण फोल ठरली. (हॉइल - विक्रमसिंघे सिद्धांताचा परिचय आठव्या प्रकरणात करून घ्यायचा आहे. )
 आर्कन्सामधील कायद्याची गंमत अशी की, तो संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे विचारात घेतलेलाच नव्हता. आमदारांनीही फुकटची लोकप्रियता मिळवण्या- साठी थिल्लरपणेच हात वर केले. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षेपेक्षा फार झपाट्याने तो मंजूर झाला. आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली. क्रिएशन सायन्स उत्क्रांतिवादाच्या बरोबर शिकवायचे तर अभ्यासक्रम कोणता ? पुस्तके कोणती ? हा विचार कोणीच केला नव्हता. खूप शोधाशोध करूनही चार-दोन फुटकळ पुस्तिकां- पलिकडे लिखाणच सापडेना. मग घाईघाईने, या तथाकथित क्रिएशन सायन्सचे संशोधन करणाऱ्या संस्थांना निरोप धाडण्यात आले, की आता कायदा तुमच्या बाजूला आहे, पण पुस्तके तातडीने लिहून द्या. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. कारण एकच की, सांगायला मुद्देच नाहीत. सुदैवाने कायदाच घटनाबाह्य ठरला आणि सगळेच प्रश्न सुटले.

 एका बाजूने विचार केला तर असे वाटते, की जुनाट मनाचा समाज, बेजबाब- दारपणे सवंग लोकप्रियतेवर डोळा ठेवून मतदान करणारे आमदार आणि मध्ययुगीन कल्पनांच्या मागे धावून विज्ञानाच्या पवनचक्कीशी झुंज घेणारे डॉन क्विक्झोट यांच्यामुळे घडलेले हे चहाच्या पेल्यातील वादळ. एका न्यायाधीशाने त्याचा थोडक्या काळात निकाल लावला. पण अमेरिकन शास्त्रज्ञ हा विषय थोडक्यांत विसरायला तयार नाहीत. हा झगडा पुन्हा पुन्हा डोके वर काढतो. १९८४ च्या जानेवारीमधे टेक्सास राज्यात एक कायदा मंजूर झाला तो असा की, शाळेत जीवशास्त्रात उत्क्रांति- वाद शिकवणे सक्तीचे असणार नाही. फंडामेंटॅलिस्ट धर्मगुरू दर रविवारी रेडिओ, टीव्ही या माध्यमातून उत्क्रांतिवादाविरुद्ध सतत गरळ ओकत असतातच. ' माक- डांना पिंजयात कोंडा आणि त्यांच्याबद्दल ममत्व वाटणाऱ्या उत्क्रांतिवाद्यांनाही त्यांच्याबरोबर धाडा ' असे सहजपणे जाहीररीत्या म्हटले जाते. या दडपणांना तोंड कसे द्यायचे हा प्रश्न शास्त्रज्ञांना बेचैन करत आहे. हे पानी लाखोंच्या समुदायांला खिळवून ठेवतात ही वस्तुस्थिती कोणाला नजरेआड करता येत नाही. कोणी सुचव-

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / १७