पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्टींवर पूर्ण श्रद्धा असावी लागते. १. बायबल ईश्वर लिखित आहे आणि त्यातील प्रत्येक प्रतिपादन हे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक सत्य आहे. २. माणसासकट सर्व जीव ईश्वराने एका आठवड्यात निर्माण केले. ३. बायबलमधे सांगितलेला नोहाचा प्रलय हा प्रत्यक्ष घडला होता. ४. अॅडम, ईव्ह यांची निर्मिती, त्यांचे आदिस्खलन या सर्व गोष्टी खभ्या आहेत. म्हणूनच मानवजातीसाठी एका प्रेषिताची गरज निर्माण झाली.
 या संस्थेचा सदस्य होण्यासाठी विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
 अशा संस्था आणि इतर सामाजिक गट यांनी पुन्हा एकदा उत्क्रांतिवादाविरुद्ध कायदा करून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. साउथ कॅरोलिना या राज्याच्या कायदे- मंडळापुढे असा एक मसुदाही एक मांडण्यात आला. पण तिथल्या कायदेमंत्र्याने इशारा दिला की, असा कायदा घटनाबाह्य ठरेल. मग हा मसुदा आर्कन्सा राज्याच्या कायदेमंडळापुढे आला आणि फारशी चर्चा न होता मंजूर झाला. १९ मार्च १९८१ रोजी राज्याच्या गव्हर्नरने त्याला संमती दिली. या कायद्यान्वये आर्कन्सा राज्यात शाळांमध्ये उत्क्रांतिवादाच्या बरोबरीने क्रिएशन सायन्स शिकवणे सक्तीचे करण्यात आले. लगेचच न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आले. विरोधकांनी तीन मुख्य मुद्दे मांडले. अमेरिकन घटनेनुसार कोणत्याही धर्माचा कायद्याने पुरस्कार करता येत नाही. या कायद्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विचारस्वातंत्र्यावर बंधन येते. ही गोष्ट घटनाबाह्य आहे. शिवाय समानता ( बॅलन्स्ड ट्रीटमेंट ) ही कल्पना अस्पष्ट आणि म्हणून अव्यवहार्य आहे. हा खटला ७ डिसेंबर १९८१ ते १७ डिसेंबर १९८१ इतके दिवस चालला. त्याचे संपूर्ण निकालपत्र 'सायन्स' या नियतकालिकाच्या १९ फेब्रुवारी १९८२ च्या अंकात पुनर्मुद्रित केलेले आहे.

 न्यायाधीशांनी हा कायदा घटनाबाह्य ठरवला. त्यांना विरोधकांचा पहिला आक्षेप ग्राह्य वाटला. सर्व कायदे निधर्मी असले पाहिजेत. सर्व धार्मिक बाबींमधे नागरिकांना आपल्या मर्जीनुसार वागता आले पाहिजे. कायञ्चातून कोणत्याही धर्माचा पुरस्कार होता कामा नये वा कोणत्याही धर्माला विरोध होता कामा नये. शाळेत बायबल वाचण्याची सक्ती करता येणार नाही. ईश्वराचे दहा आदेश (टेन कमांडमेंटस् )

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / १५