पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण दुसरे


उत्क्रांतिवाद मुर्दाबाद


 चार्लस् डार्विनचे 'ओरिजिन ऑफ स्पिसीज... ' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर प्रतिकूल प्रतिक्रियांचे मोठेच वादळ निर्माण झाले. उत्क्रांतिवादाला विरोध करणाऱ्यांचे दोन गट होते. एक वैज्ञानिकांचा आणि दुसरा धर्ममार्तंडांचा. काही मंडळी दोन्ही गटांत होती. तर काही मंडळी दुसऱ्या गटातील लोकांबरोबर हातमिळवणी करून डार्विनवर हल्ला चढवत होती. ऑक्सफर्डचा बिशप सॅम्युएल विल्बरफोर्स याच्याकरवी उत्क्रांतिवादाची हेटाळणी करवण्यामध्ये काही बड्या शास्त्रज्ञांचा हात होता, भाज वैज्ञानिक सरसकटपणे उत्क्रांतिवाद मान्य करतात. मतमेद असतील तर तपशिलाचे. धर्माच्या क्षेत्रात मात्र अजूनही उत्क्रांतिवादाविरुद्ध आवाज उठवलेला ऐकू येतो. डार्विनने बायबलला खोटे पाडले हे अनेकांना असह्य होते.

 बायबलमधे नेमके म्हटले आहे तरी काय ? विश्वाच्या आणि प्राणिमात्रांच्या निर्मितीबद्दल बायबलच्या जेनेसिस या भागाच्या पहिल्या दोन प्रकरणांत ही चर्चा

१२ / नराचा नारायण