पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळ्यांची टक्केवारी वाढली. अशा तऱ्हेने रंगात उत्क्रांती होऊ लागली.
 डार्विनच्या सिद्धांताचे ढोबळमानाने स्वरूप असे आहे. आज आपल्यापैकी बहु- तेकजण या मांडणीकडे त्रयस्थपणे पाहू शकतात. पण डार्विनच्या समकालीनांमध्ये मात्र फार तीव्र प्रतिक्रिया होत्या. धार्मिक लोकांना डार्विन बायबलविरोधी वाटला तर काही सामाजिक विचारवंतांना डार्विनच्या ' रगेल तोच तगेल' या न्यायामध्ये आर्थिक विषमतेचे स्पष्टीकरण मिळाले. काहीजणांना डार्विनने केलेले निसर्गाचे क्रूर चित्रण अन्यायकारक वाटले. या प्रतिक्रियांचे स्वरूप पुढच्या प्रकरणात पाहू.
रंगेल तोच तगेल / ११