पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थितीशीही. सभोवतालच्या निसर्गाचे संथ मंद रूप पाहून हे खरे वाटणार नाही. हे युद्ध काही सतत चालू नसते. मधूनच थोड्या चकमकी वडतात, कचित लढायासुद्धा होतात. त्यामुळेच कदाचित या गोष्टी डोळ्यांत भरत नसतील... प्राण्यांच्या बहुतेक जातींना उपलब्ध अन्न तेवढेच राहते, पण त्या जातीची संख्या मात्र पटीत वाढते... या संख्येवरच बंधन कसे पडते याची कल्पना करता येत नाही. पण अनेकदा बीज, अंडी किंवा पिल्ले यांच्यावर गदा येते... समजा भोवतालची परिस्थिती बदलली... तर अन्नासाठी कराव्या लागणाऱ्या सततच्या धडपडीत ज्या प्राण्यांमधे परिस्थितीनुरूप बदल झालेले असतील ते प्राणी तगतील हे निस्संशय. ज्या पिलांना हे आवश्यक बदल अनुवांशिकतेने मिळतील त्यांचा फायदा होईल. परिस्थितीचा रेटा आणि मृत्यूचा वरवंटा हजारो पिढ्या डोक्यावर असल्यानंतर प्राण्यांवर परिणाम नक्कीच होणार. गायी, मेंढ्या यांच्यात, वेचून वेचून माणसाने नाही का हव्या तशा जाती घडवल्या ?
 आता वॉलीसची मांडणी बघा.
 एकाच जातीच्या प्राण्यांमधील फरक, मग तो कितीही किरकोळ का असेना, प्राण्यांवर काही ना काही परिणाम करतो. नुसता रंग वेगळा असला, तरी प्राणी कमीजास्त उठून दिसतो आणि त्याचा भक्षकांपासून कमी किंवा अधिक बचाव होतो... समजा, भोवतालच्या निसर्गात बदल झाले, दुष्काळ पडला, टोळधाड येऊन गेली, नवीन भक्षक प्राणी आले.... जीवन अधिक खडतर करणारा कोणताही बदल झाला की, प्राण्याचे आयुष्य पणाला लागते... त्यातून टिकतात त्यांचा वंश परिस्थिती सुधारल्यावर फोफावतो. जे हरतात ते संपतात. आपल्या एखाद्या अवयवाचा पुष्कळ उपयोग करून प्राणी त्याचा विकास घडवून आणू शकतो. हीलमार्कची कल्पना इतर अनेकांनी केव्हाच धुडकावून लावली आहे. माझ्या मते असल्या स्पष्टीकरणाची गरजच नाही... सारखा अधिकाधिक उंच फांद्यांवरचा पाला खाण्याचा प्रयत्न केल्याने जिराफाची मान लांबलेली नसून, ज्यांची मान आधीच जास्त लांब होती त्यांना दुष्काळाला तोंड देता आले.
 आता या सिद्धांताची मांडणी थोडी तपशिलाने आणि उदाहरणांसह करू या. याच्या चार ढोबळ पायऱ्या आहेत.

 १. अफाट उत्पत्तिक्षमता परिस्थिती अनुकूल असेल, अन्न: विपुल असेल. जागा

६ / नराचा नारायण