पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पना होत आहे.कर्नाटकामधे पवित्र बने अथवा देवराया नव्याने स्थापना होत आहेत.वनस्पतींच्या विविध जातींचे रक्षण करणाऱ्या या प्राचीन रीतीचे आता पुनरुज्जीवन होत आहे.
 आज निरनिराळ्या देशातील विचारवंत मानव आणि निसर्गाच्या अन्योन्य संबंधां-बद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडू लागले आहेत.माणूस अडाणी होता तेव्हा निसर्गाच्या कोपापुढे हतबल होत होता.निसर्गाची पूजा आणि आळवणी करीत होता.विज्ञानाच्या प्रगतीतून मानवाने अनेक क्षेत्रात निसर्गाला काबूत आणले.'जितमयां' वृत्ती वाढली.पण आता विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात,विशेषतः नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपभोगाच्या संदर्भात, मानवी शक्तीची मर्यादा स्पष्ट होऊ लागली आहे.शहाणपणाची गरज,निकड बाटू लागली आहे.हार्डिन या शास्त्रज्ञाने या संबंधात 'ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स ' असा शब्दप्रयोग केला आहे. बहुजन समाजाची शोकांतिका याचा थोडक्यात अर्थ असा की, समष्टीचे हित हे व्यक्तीव्यक्तीच्या हितांच्या बेरजेपेक्षा फार निराळे आहे.
 अॅडम् स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने दोन शतकांपूर्वी व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा उभारला.जो तो आपापल्या कल्याणाचा विचार करील तर समाजाचे कल्याण आपोआप होईल.पण निसर्गसंपत्तीच्या संदर्भात हे शब्दशः मान्य करणे कठीण आहे.
 साधे गावचे गायरान घ्या.तेथून सबंध गावाला भरपूर चारा मिळावा असे वाटत असेल तर पावसाळ्याचे पहिले काही आठवडे गायरान पूर्ण संरक्षित हवे.नंतर गवत कापले तर सर्वांनाच अधिक मिळते.पण गुरे उन्हाळ्याच्या उपासमारीने भुकेली असतात.रान हिरवे दिसते.आपल्याकडे कोणाचे लक्ष नाहीसे पाहून रात्री तेथे गुरे घालण्याचा मोह होतो.एकाला चोरी पचली की सर्वच चोग्या करू लागतात.यातून होते एकच.ते म्हणजे सर्वांना मिळून फार कमी गवत हाती लागते.आपली वने,आपले पाणी,आपली मासळी,एक ना दोन.सर्वच बाबतीत शहाणपणाने संयमाने वागण्याची जरूर आहे.हे न केल्यास पुढील पिढ्यांचे हाती वैराण निसर्गाची नरोटी दिल्याचा दोष आपल्या पदरी येईल.उत्क्रांतिवादाच्या यापुढच्या वाटचालीतून एक नवे सामाजिक शहाणपण अंगी बाणवण्याचा मार्ग दिसेल,अशी शक्यता वाटते.

 उस्क्रांतिवादाची सुरुवात, डार्विनच्या काळात 'गालापागोस बेटावरील फिंच

१६० / नराचा नारायण