पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संख्यावाढीच्या दबावाखाली या पद्धतीची व्यवहार्यता संपत आली आहे.संबंधित जमाती (स्वतः किंवा शासनाच्या मदतीने ) दुसरा कोणता पर्याय निवडतात ते बघायचे.
 आधुनिक इतिहासात साम्राज्यवादी सत्तांनी वसाहतींच्या प्रदेशातील निसर्गसंपत्ती मनमुराद ओरबाडली. त्यांना अडवणे स्थानिक जनतेला अशक्य होते.अशा वेळी निसर्गसंरक्षणाचे पिढीजात संकेत शिथिल झाले.याचा परिणाम म्हणून निसर्गाचा मोठाच व्हास झाला.भारतात ब्रिटिशांनी रेल्वेच्या स्लीपर्ससाठी आणि जहाजबांधणी-साठी जंगले लुटली. त्याकरता नवे जंगल कायदे केले.ग्रामस्थांचे सभोवतालच्या जंगलांवरचे हक्क रद्द केले.मग संयमाने वागण्यात कोणालाच रस उरला नाही.
 तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेसुद्धा संयमित वागण्याची रीत मागे पडू लागते.कारण एका क्षेत्रातील साधनसंपत्ती आटली तर दुसरीकडे जाणे शक्य असते.दीर्घकाल त्याच ठिकाणी अथवा त्याच साधनावर उद्योग आणि भांडवलदार अवलंबून नसतात.
 कागद बनवण्यासाठी बांबूचा उपयोग होतो.पण तंत्रज्ञानाच्या जोरावर इतर अनेक वनस्पतींचाही वापर त्यासाठी करता येतो.म्हणून कागद गिरणीवाले बांबूच्या जंगलांचा संयमाने वापर करीत नाहीत.मच्छीमारी क्षेत्रात बाहेरील भांडवल आणि ट्रॉलर्सच्या रूपाने नवे तंत्रज्ञान यांनी आधुनिकतेच्या नावाखाली धुडगुस घातला.लहान मासे न पकडणे,मासळीच्या पुनरुत्पत्तीच्या आड येईल अशी रीत न वापरणे यासारखे त्यांनी झुगारले.ताबडतोबीने त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला.त्यानंतर मत्स्य-दुष्काळ पडला तर त्यांना त्याची परवा नाही.भांडवल दुसऱ्या व्यवसायाकडे हल-वायचे. पारंपरिक पद्धतीने उपजीविका करणारे कोळी, आदिवासी व इतर मागास गटांना हे शक्य नसते.म्हणून त्यांना या गोष्टींचे परिणाम भोगावे लागतात.

 साम्राज्यवादी, भांडवलदार,तंत्रज्ञानाचे मालक हे गट निसर्गसंपत्तीचे शोषण करून निघून जातात तेव्हा, वा तंत्रज्ञान सर्वांच्याच हाती येते तेव्हा पुन्हा एकदा या संपत्तीचे जतन करणाज्या रीतीभातींना अनुकूल काळ येतो. जपानमधे किनारपट्टी-वरील मासेमारीमघे आता जुन्या काळचे नियम आणि संकेत पुन्हा रूढ होऊ लागले आहेत.( महासागरी मासेमारीमधे मात्र जपानी जहाजे अजूनही काऊबॉय इकॉनॉमी पद्धतीनेच वागतात.) उत्तर प्रदेशात चिपको आंदोलनातून संयमाची पुनश्च प्रतिष्ठा-

नराचा नारायण / १५९