पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडलेला दिसतो.
 १८ आणि १९ व्या शतकात पाश्चात्त्य सत्तांनी नवी समाज संघटना, नवे युद्धविज्ञान यांच्या जोरावर जगाचे स्वामित्र मिळवले. त्यांच्या विद्या,त्यांचे तंत्रज्ञान,त्यांची शासनपद्धती यांचा अभ्यास करून अंगीकार करणे हे जवळपास कोणत्याच समाजाला शक्य झाले नाही.एका दृष्टीने पाहता यंत्रयुगाच्या आगमनानंतर,विज्ञानाची घोडदौड सुरू झाल्यावर स्थितिबदलाचा वेगही अफाट वाढला.त्या मानाने रीतिबदल मात्र फार सावकाश होत आहेत.म्हणून विविध समाजात तणावाचे प्रमाण वाढत असावे.
 मानवी संस्कृतीचा पाया म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती.या साधनसंपत्तीचा उपभोग घेण्यावर एक मर्यादा आहे.मऊ लागले म्हणून कोपराने खणाल तर पस्ताचाल.ऊस गोड आहे म्हणून मुळापासून खाल तर तो पुन्हा उगवणार नाही.सोन्याची अंडी देणारी कोंबडीच कापून खाल तर अंड्यांची आवक बंद होईल.व्याज खात राहाल तर टिकाल.मुद्दल खाऊन बसाल तर संपाल,आज आपण या नियमाचे चटके अनुभवतो आहोत.पेट्रोल पुढच्या शतकात संपणार.जंगले रोडावत चालली.मासेमारांना आजच हात हालवत परत यावे लागते आहे.दरवर्षी शेकडो एकर जमीन नापीक होत आहे.अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो.त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो.
 प्राण्यांमधे असा विचार करून कोणी संयमाने वागत असेल का? मेक्सिकन हॉर्ड लिझार्ड नावाचा सरडा आहे. तो आपल्या मुलखातल्या सगळ्या मुंग्या खात नाही.कारण मग आणखी मिळायच्या बंद होतात. जोवर काही मुंग्या त्या भागात फिरत आहेत तोवर त्यांच्या वासाने इतरही येतात.म्हणून हा प्राणी हातचे राखून खातो आणि मुद्दल संपवत नाही.

 माणसात असा संयम दिसतो का? त्याकरता मुळात माणसांचा गट त्या विशिष्ट नैसर्गिक साधनावर दीर्घकाळ गुजराण करत असला पाहिजे, तर व्याज मुद्दल वगैरे गोष्टी त्यांच्या आपोआप ध्यानात येतील. समजा, संयमाने वागायचा निर्णय झाला,तर तो अमलात येऊन त्याचे फायदे मिळण्यासाठी जीवनात दीर्घकाल स्थैर्य हवे.आणि शेवटी, आपण पोटाला चिमटा घेऊन उमी केलेली संपत्ती दुसराच कोणी

नराचा नारायण / १५७