पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वस्त्यां बदंळेत राहणाऱ्या समाजाचे संघटन अगदी सैलसर राहते.सामाजिक नाती तात्पुरती होतात.कायमची खेडी बनली, त्यातली लोकसंख्या वाढली की,पाटील निर्माण होतात.गावपंचायतीचे महत्त्व वाढते.
 शेतीमधे कष्टांच्या स्वरूपात मोठी भांडवल गुंतवणूक झाली,बांधबंदिस्ती केली,धरणे बांधली, कालवे खणले की,उत्पादन वाढते.तोंडे वाढली तरी चालतात.दुरुस्तीची कामे निघतात. पाण्याच्या सामायिक वापराचे नियम करावे लागतात.संघटन आणखी विकसित होते.कामात थोडी थोडी विशेषज्ञता येऊ लागते.खेड्यांची शहरे व्हायला सुरुवात होते.पहिल्या प्रगल्भ संस्कृती निर्माण झाल्या त्या अशा बागाईत शेतीच्या जोरावर.पुरातन इराक हे त्याचे मोठेच उदाहरण आहे.
 दोन आदिवासी जमातींना वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीला तोंड द्यावे लागल्या-वर वेगवेगळ्या प्रकारची समाजरचना कशी विकसित झाली याचे एक कुतूहलजनक उदाहरण अमेरिकेत ॲरिझोना राज्यातल्या दोन रेड इंडियन जमातींमधे दिसते.इथे जमीन सुपीक आहे.पाच दहा इंच पाऊस पडतो,पण पाटबंधारे करण्या अनुकूल स्थिती आहे. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत पिमा आणि पापागो या जमाती मुख्यतः शिकार आणि जंगली कंदमुळे, फळे यांच्यावर उदर निर्वाह करीत.पापागो जमातीचा एक चतुर्थांश अन्नपुरवठा शेतीतून होत असे.तर पिमा जमातीचा साठ टक्के.दुष्काळात शिकारीवरचा भर वाढे.पापागो जमातीच्या प्रदेशात पाणीपुरवठ्याची अनिश्चिती होती.विहिरी छोट्या आणि कमी पाणी देणान्या होत्या.एका विहिरीवर एक-दोन कुटुंबांचे भागू शकत असे.त्या डोंगराळभागात असत.खोज्यात पाण- लोटावर थोडी शेती करता येई. म्हणून पावसाळ्यात डोंगर सोडून ओलाव्याच्या जमिनीकडे यायचे आणि नंतर पुन्हा आपापल्या विहिरीकडे परतायचे अशी रीत होती.त्यामुळे माणसे सुटीसुटी राहात.

 पिमा जमात नदीच्या आधाराने कायमच्या घरात वस्ती करून राहात असे.त्यांची खेडी मोठी आणि एकमेकांपासून दूर असत.मोठे खेडे म्हणजे काही शेकडे वस्ती.गावप्रमुखाला महत्त्व होते.गावच्या गात्र शिकारीला जात असे.छोटे बंधारे,कालवे यांची दुरुस्ती गावकरी मिळून करत.जंगल साफ करून नवीन जमीन शेती करणे आणि तिचे वाटप करणे ही कामेही गावप्रमुखाच्या पुढाकाराने होत.स्पॅनिश

नराचा नारायण / १५५