पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झोडला असेल.असे म्हणतात की हत्ती,पाणघोडा यांच्यासारख्या राक्षसी प्राण्याचे मृतशरीर मिळाले आणि त्यांची इंच इंच जाड कातडी मेदून आतील अवयव काढणे जमले तेव्हा प्रथम असे अपघात झाले असतील,आदिमानव सुमारे २० लक्ष वर्षांपूर्वी दगडी हत्यारे वापरू लागला असावा असे मानले जाते.आफ्रिकेमधे सुमारे १५ लक्ष वर्षांपूर्वीचा एक मानवी सांगाडा रॉबर्ट लीकी या शास्त्रज्ञाला सापडला.व्हिटॅमिन ए च्या अतिसेवनामुळे विषबाधा झाल्याचा भरपूर पुरावा या सांगाड्यावर दिसला.
 अगदी अलीकडच्या काळात दक्षिण ध्रुवाच्या शोधात जाणाऱ्या दोन पाश्चात्य घाडसी प्रवाशांवरही काहीसा असाच प्रसंग गुदरला.कुत्र्यांनी ओढलेल्या गाडयातून ते बर्फाबरून प्रवास करीत होते.वाटेत वादळे,अपघात यांमुळे त्यांचे सर्व अन्न हरवले.उपासमार झाली.तेव्हा अखेरीस जवळच्या कुत्र्यांना मारून खावे असा त्यांनी निर्णय घेतला.पण त्या कमालीच्या थंडीत शिजवल्याविना मांस खाणे जमेना.फक्त काळीज तेवढे चावता येत होते.तेव्हा काही दिवस ते दोघे निव्वळ काळीज खाऊन जगले.त्यात एकजण मेला आणि दुसरा वेडा झाला.काळीज खाऊन ए व्हिटॅमिनचा ओव्हरडोस झाल्याने हे घडले असे निदान नंतर डॉक्टरांनी केले.
 असे टक्केटोणपे खाऊन माणसाच्या आहारविषयक रूढी उत्क्रांत झाल्या असाव्यात.
 आपला पोशाख सामान्यपणे आपल्या व्यवसायाला जीवनपद्धतीला अनुकूल असतो.मेंढपाळ धनगर कपडे कसेही मळके फाटके घालतात किंवा लंगोटी लावतात.पण डोक्याला लाल पटका बांधतात.मेंढ्यांना तो बावटा इशारे देतो.यांच्या चपलाही चालण्याला अनुकूल असतात.त्यांचा तळ फार जाड आणि वजनदार असतो.शेरभर वजनाच्या वहाणा घालायची त्यांची पद्धत असे.फार उष्ण हवामानात फिरणारे अरब पांढरे,जाड आणि ढगळ कपडे घालतात.त्यामुळे शरीराच्या भोवताली थंड हवेचा थर निर्माण होतो.कान-मानही झाकलेली असतात.त्यामुळे गरम हवेचे दुष्परिणाम टळतात.हीच पद्धत आपल्याकडे खानदेश आणि विंदर्भात दिसते.ग्रामीण महाराष्ट्रा-तल्या कामकरी बायकांनी सोइस्कर,कासोट्याचे लुगडे नेसणे सोडलेले नाही.दक्षिणी नृत्यांगना नाचापुरत्या तरी तशाच प्रकारचा वेश घालतात.पाण्यात काम करणाऱ्या कोळणींची लुगडी गुडघ्यापर्यंत वर जातात एवढाच फरक.

 माणूस अन्न कसा मिळवतो यावर त्याचे सामाजिक संघटन खूपच अवलंबून

नराचा नारायण / १४९