पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राणी आहे.मानवाची ही प्रगती कशी झाली? त्याचे सामर्थ्य हे विज्ञान आणि तंत्र-ज्ञानातून आलेले आहे.ही गुरुकिल्ली त्याला कशी सापडली ? मानवी संस्कृती कशी घडली ? उत्क्रांतिवादाच्या विकासामधे सर्वात अवघड भाग हा आहे.या प्रश्नांची उत्तरे देताना शास्त्रज्ञ अजूनही चाचपडत आहेत.चारशे कोटी वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या पृथ्वीवर कार्बन, ऑक्सिजन,सल्फर,नायट्रोजन,फॉस्फरस अशी अनेक मूलद्रव्ये होती.ती आपण आजही पाहू शकतो आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासू शकतो.पण या अभ्यासात प्रचंड उरस्फोड करणारांनाही ही मूलद्रव्ये एकत्र येऊन डीएन्ए चा कण, पुनरुत्पत्ती करू शकणारा कण,आदिम जीव घडू शकेल असा तर्क करता येणे अवघड वाटते.जगप्रसिद्ध पदार्थविज्ञानतज्ञ फ्रेड हॉइल तर ही उपपत्ती सरळ अमान्यच करतात.निर्जीवातून सजीवाची निर्मिती जितकी अतर्क्य वाटते तितकीच किंवा त्याहूनही अतर्क्स घटना आहे ती यंत्रवत पुनरुत्पत्ती करणाऱ्या जीवसृष्टीच्या उलथापालथीतून झालेली विचार करणाऱ्या अस्तित्वाचे भान असलेल्या मानवाची निर्मिती.मानवी संस्कृतीची निर्मिती.परग्रहावरील कोणी बुद्धिमान जींव पृथ्वीवरील मानवाव्यतिरिक्त इतर सर्व प्राणिमात्रांचा अभ्यास करतील तरी त्यांना या घोटाळ्यातून मानवासारखा जीव निर्माण होईल असा तर्क करता येणार नाही.मानवी संस्कृती कशी विकसित होईल याचा अंदाज बांधता येणार नाही.
 आता एक महत्त्वाचे प्रमेय मांडायचे आहे. संस्कृतीतील बव्हंश गोष्टी मानव-समूहांना वंशवृद्धी आणि जीवनकलहातील यश प्राप्त करण्यासाठी मदत करणाया असतात.या ठिकाणी अनेक वाचक अतिव्याप्तीचा दोष नक्कीच देतील.त्याकरता आपण असे म्हणू की,संस्कृतीच्या ज्या अंगांचा अशा तऱ्हेने अनुरूपेतवर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही,त्यांचा अभ्यास उत्क्रांतिवादाच्या माध्यमातून शक्य नाही.परंतु संस्कृतीच्या फार मोठ्या भागाचा उलगडा उत्क्रांति- तत्त्वातून होतो.अशा काही बाबींचा विचार या प्रकरणात करू.

 विज्ञान आणि तंत्रज्ञान ही मानवी संस्कृतीची शक्तिकेंद्रे आहेत.कौशल्य आणि हुशारी तर प्राणिमात्रातही आढळतात.माशीला जन्मतःच उडता येते तर बदकाला जन्मतःच पोहता येते.हे अनुवंशिक कौशल्य आहे.प्राणी अनेक गोष्टी शिकू शकतात.जन्मानंतर काही तासांत विशिष्ट संस्कार पक्के होतात.उदाहरणार्थ,

नराचा नारायण / ९४२