पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दहावे नराचा नारायण माणूस हा निसर्गाचा एक भाग आहे. येथील जीवसृष्टीच्या उत्क्रांतीमधे त्याचा जन्म झाला, त्याची घडण झाली. पण आज तो पृथ्वीवरील एक कर्तुमकर्तुम शक्ती होऊन बसला आहे. निसर्गरचनेमधे प्रचंड उलथापालथ करण्याचे सामर्थ्य त्याने मिळवले आहे. कोणत्याही हवामानात, कोणत्याही उंचीवर किंवा सागराच्या तळाबर तो लीलया विहार करतो. आता तो अवकाशात भरारी घेत आहे. इतर कोणत्याही प्राण्याला त्याच्या लक्षांशानेसुद्धा निसर्गावर काबू मिळवता आलेला नाही. झुरळे, मुंग्या, डास व इतर कीटक जगण्याच्या चढाओढीत जिंकत आहेत. मानवनिर्मित विषारी पदार्थांना पुरून उरत आहेत. पण त्यांचे यश एवढेच. निसर्गात बदल करण्याची त्यांची शक्ती फार सीमित आहे. शिवाय त्यांचा जगण्याचा झगडा, त्यांच्यात होणारे गुणबदल यांचे त्यांना भान नाही. ती प्रजोत्पत्ती करणारी यंत्रेच आहेत, म्हणा ना. आपल्या अस्तित्वाचे भान असणारा मानव हा बहुधा एकमेव १४२ / नराचा नारायण-