पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साथीदार सर्वांना नकोसा होत असेल.उलट पट्टीचा शिकारी आपोआप नायक होत असेल.शिकारीत धोके असणार.त्यांना घाबरणारा पुरुष एकटा पडत असेल.त्याला बायको मिळणे अवघड जात असेल.साथीदार जखमी झाला,संकटात पडला तर इतरांनी त्याच्या मदतीला जायला हवे.त्याचा वाटा दगा न देता त्याच्या घरी पोच- वायला हवा.एकमेकांशी इमानदारी हवी.अधूनमधून चुका होणारच.त्या माफ करण्याचा उमदेपणा हवा.ज्यांच्या बरोबर खेळलो,वाढलो ज्यांना पूर्ण ओळखतो अशा साथीदारांबरोबर शिकारीला जाणे पुरुष पसंत करत असतील,म्हणजे भाऊ किंवा जवळचे नातलग एका टोळीत जात असतील.एकत्र शिकार करण्याबरोबर एकत्र ( जवळजवळ ) राहणे आलेच.अशा तऱ्हेने नात्यातल्या पुरुषांचा गट जवळ-जवळच्या गुहांमधे राहत असेल.
 स्त्रिया आपापली मुले संभाळत घरी थांबत असणार.अग्नी जिवंत ठेवणे हे त्याचे महत्त्वाचे काम असणार.बहुतेक काळ त्या गर्भार असतील किंवा अंगावर पाजत असतील.नवऱ्याने आणलेली शिकार,गोळा केलेली फळे,कंदमुळे,जमवलेले जळण पुरवणे ही त्यांची डोकेदुखी असेल.वाळवत ठेवलेली कातडी राखणे हेही काम असेल. कदाचित शेजारीण बाजवीपेक्षा जास्त उसनवारी करेल का अशी काळजी असेल.पोरेबाळे आपसात मारामाज्या करत असतील.आपल्या पोरांची पाठ राखण्याचाही उद्योग त्यांना करावा लागत असेल,यातून स्त्रियांचे परस्पर संबंध तणावाचे होत असतील.यात हस्तक्षेप करणे पुरुषाला शक्य होत नसेल कारण मग शिकारीच्या टोळीत कुरबूर सुरू होऊन अडथळे येतील.

 म्हाताज्या माणसांचे काय ? एकतर त्यांची संख्या फार कमी असेल.जंगलात म्हातारी जनावरे फार कमी असतात.ती रोगराई, उपासमार,भक्षक प्राणी यांना सहज बळी पडतात.आदिकालात माणूस सरासरी किती वर्षे जगत असेल ? एका अंदाजानुसार निअँडरथल मानव सरासरी ३० वर्षे जगत असेल.२००० वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात हा आकडा ३२ पर्यंत गेला होता,६०० वर्षांपूर्वी इंग्लंडमधे तो ३८ वर्षांपर्यंत वाढला.सुमारे १०० वर्षांपूर्वी अमेरिकेत सरासरी बयोमान ६० वर्षे होते आणि आज ते ७० वर्षे आहे.तेव्हा वृद्ध नागरिकांची मोठी संख्या ही आपण अगदी अलीकडे बघत आहोत.दुर्दैवाने अमेरिकेत या नागरिकांना बरेचदा आपण

१४० / नराचा नारायण