पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कष्टातून निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर टाकण्यासाठी हा पर्याय शोधला असावी.माकडांबर हा प्रसंग येत नाही, कारण ती शिकारी नाहीत.कुत्रे धापा टाकून जीभ गाळत आपले शरीर थंड करतात.माणसाच्या घामाच्या ग्रंथी हेच काम केसाळ पांघरूण नसल्यास उत्तमपणे करू शकतात.मग काखेत आणि गुहझेंद्रियांच्या आसपास केस का शिल्लक आहेत ? असे म्हणतात की,स्त्रीपुरुष आकर्षणात घर घालणारी द्रव्ये निर्माण करणाऱ्या ॲपोक्रीन ग्रंथी या भागात आहेत.त्यांच्यापासून निघणारे स्त्राव सहज उडून जाऊ नयेत म्हणून या केसांचा उपयोग होतो.
 माकडांच्या टोळीसमोर भाकरी टाकली तर टोळीतला हुप्प्या (मुख्य नर,डॉमिनंट मेल ) पुढे येऊन ती उचलतो नि खाऊ लागतो.इतरांना देत नाही.माया ती घेऊ लागल्या तर त्यांना पिटून काढतो.पण माद्यांना झाडावरची फळे खाणे शक्य असते.पोटाशी पिल्लू असतानासुद्धा. पिल्लाला पाजत शिकार करणे अवघड आहे.गर्भारपणीही अवघड आहे.त्यामुळे शिकारी प्राणी आपल्या कुटुंबियांना खाऊ घालतात.एरवी ते संपून जातील.अपवाद म्हणून चिंपांझी नर माकड माजावर आलेल्या मादीचे लाड करतात.तिच्या आवडीचे पदार्थ तिला पुरवतात.आसाममधील हूलॉक गिबन माकडांची जोडपी अनेक वर्षे टिकतात.पण हा अपवादच.जंगली कुत्रे शिकार केल्यानंतर एक वर्तुळ करून उभे राहतात आणि आधी पिल्लांना खाऊ देतात.किंवा आधी खाऊन आणलेले पोटातून काढून पिल्लांना खाऊ घालतात.माणसाने ही पद्धत स्वीकारली ती नर-मादी संबंधात एक वेगळे पाऊल टाकून.

 नर आणि मादी यांच्यामधील आकर्षण सार्वत्रिक आहे.पण नराने मादीबरोबर दीर्घकाळ राहणे ही तितकी सार्वत्रिक गोष्ट नव्हे.युगुलातील एकाची शिकार झाली म्हणून दुसऱ्याने देहत्याग केल्याची घटना हंस आणि क्रौंचांमधे घडत असेल( किंवा हा, जे न देखे रवि तेही देखे कवि असा प्रकार असेल.) पण माकडांमधे नाही.व्यंकटेश मांडगुळकरांच्या ' सत्तांतर 'मधे माकडिणींच्या दादल्याला हाकलून देऊन त्याची जागा दुसरा नर घेतो.पण माकडिणी त्याला सोडून पहिल्या दादल्याला शोधायला जात नाहीत.त्या घाबरतात ते नवीन दादला लढाईच्या जोषात आपल्या-लाही मारेल या भीतीने.माणसामधे नर आणि मादी यांनी एकमेकांना धरून राहावे यासाठी निसर्गाच्या अनेक युक्त्या दिसतात. एक म्हणजे समागमकाल वाढवणे.

माकडापासून माणूस / १३७