पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माकडांमधे यातली कोणतीच पद्धत नाही.माझी आपले पोट स्वतः भरते.नर तिला खाऊ घालत नाही. माकडांना घरही नसते.रोज रात्री वेगळ्या झाडावर मुक्काम.घरच नसले तर त्याची सफाई करण्याची गरज कुठली ? माकडांमधे मलमूत्रविसर्जनाचे नियम नाहीत.असाल तिथेच विधी करायचे.गुहेत घरात राहणाऱ्या प्राण्याला हे परवडणार नाही.अशी घाण केली तर तिथेच राहणाज्याला रोगराई बाधेल.म्हणून शिकार करणारे आणि एका ठिकाणी राहणारे प्राणी घरापासून दूर मलविसर्जन करतात.मांजरे मातीने घाण झाकून टाकतात.कुत्रे मागच्या पायांनी माती उडवून असाच प्रयत्न करतात.अगदी काँक्रीटच्या सडकेवर असले तरी.आता खांबा-खांबावर पाय वर करणे हाही कुत्र्यांचा स्वभाव आहे हे खरे.पण त्याचे कारण वेगळे.हा माझा मुलुख आहे अशी जाहिरात करण्याचा तो भाग.)
 शिकारी प्राण्यांच्या अंगावर तऱ्हेतऱ्हेच्या गोचिड्या होतात. रक्त पिऊन त्या जगतात.माकडांच्या अंगावर गोचिड्या होत नाहीत.उवा होतात.उवा आणि गोचिड्यांच्या प्रजोत्पत्तीतल्या फरकाचा हा परिणाम आहे.गोचिड्या जमिनीवर अंडी घाळतात.त्यातून बाहेर आलेली अळी आजूबाजूच्या घाणीवर जगते.दोन आठ-वड्यांनी तिचे गोचिडीत रूपांतर होते.आता ती रक्त पिण्याकरता प्राणी शोधते.या क्रमात, एकाच जागी अनेक आठवडे राहणारा प्राणीच तिच्या वाट्याला येऊ शकतो.रोज घर बदलणाऱ्या माकडाचा तिला उपयोग नाही.मग माणसाच्या अंगावर का गोचिड्या नाहीत ?कारण लपायला माणसाची कातडी केसाळ नाही.माणूस केस कसे गमावून बसला ? खरे तर माकडांना केसांमुळे थंडीत किती उबदारपणा येत असेल. गोचिड्यांचा उपद्रव टाळण्यासाठी केस गळाले का ? पण गोचिड्यांमुळे प्राणी काही मरत नाही.एक कटकट वाढते, एवढेच. त्याकरता सर्व प्राण्यांना उपयुक्त ठरलेले केसांचे पांघरूण का सोडायचे? उन्हात कातडीला मिळणारे संरक्षण का गमवायचे ?

 काही अपवाद वगळता सस्तन प्राण्यांना केस असतात.वटवाघळांच्या पंखावरचे केस गेलेले आहेत.त्यामुळे उडताना हवेचा त्रास कमी होतो.व्हेल मासा, डॉल्फिन,हिप्पोपोटॅमस या सस्तन प्राण्यांचेही केस गळले आहेत.पण ती पाण्यात सुलभ हालचाल करता यावी यासाठी केलेली तडजोड असावी.माणसाने बहुधा शिकारीच्या

१३६ / नराचा नारायण