पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानवाचा मेंदू याच्या दुप्पट म्हणजे एक लिटर घनफळाचा होता.तो आगीचा वापर करत असे.तो आपल्या शत्रूची हाडे फोडून आतला मऊ पदार्थ खात होता.म्हणजे तो खजनाहारी ( कॅनिंबल ) होता.इतर प्राणी हाडे चावतात. फोडत नाहीत.निअँडर-मानवाचा प्रसार युरोपात झाला होता.याचा मेंदू आधुनिक मानवाएवढा होता.हा मृतांचे दफन करत असे.अनेक हत्यारे वापरत असे.आधुनिक मानवाच्या पूर्व-जांनी दक्षिणेकडून येऊन याला संपवले असावे.
 अवशेष स्वरूपात आपल्याला माहीत असलेला सगळ्यात पुरातन म्हणजे ९ लाख वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलोपिथेकस मानवसुद्धा शिकारीवर जगत होता.उलट बहुतेक माकडे मात्र शिकार करत नाहीत.( चिंपांझी नर मधून मधून हरणे, दुसऱ्या जातींची छोटी माकडे यांची शिकार करतात.) म्हणजे शिकार हा त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार नव्हे. चवीला,डावी बाजू म्हणून थोडेफार मांसाशन चालत असावे.पक्ष्यांच्या घरट्यातून अंडी पळवून ती खाणे हा काहींचा आवडता उद्योग असतो.त्यासाठी,एरवी पाण्याच्या वाटेला न जाणारी माकडे नदीसुद्धा पोहून पार गेल्याचे उदाहरण मी ऐकले आहे.पण मुख्यतः माकडे शाकाहारीच म्हणायची.मग झाडांवरून गवताळ प्रदेशात उतरलेला आदिमानव शिकार का करू लागला ? या नव्या व्यवसायाशी त्याने कसे जुळवून घेतले ?

 हा पूर्वज पूर्णपणे शाकाहारी नव्हताच. हाताशी येतील ते किडे, अळ्या, गोगल-गायी असे छोटे मांसल जीव तो मटकावून टाकत होता.पण व्याकरता वेगळे कौशल्य लागत नव्हते. गवताळ प्रदेशात या प्राण्याला अन्नाची टंचाई जाणवू लागली.गवत पचवता येत नव्हते.कंदमुळे शोधण्यात, खणून काढण्यात फार कष्ट पडत होते.( आजसुद्धा आपल्या आदिवासींच्या आहारात जंगली कंदमुळांचे स्थान फार दुय्यम आहे.उपास पडायला लागले तरच त्यांच्या शोधात जायचे.गुडघ्यापर्यंत नाही तर कमरेपर्यंत खणावे तेव्हा कोठे चार दोन कांदे हाताला लागणार.तेही बरेचदा कडू निघतात.मग ते तास अन् तास पाण्यात धुवायचे.आणि कडूपणा गेला असे मानून खायचे. हा पर्याय कोणी सुखासुखी स्वीकारत नाही.) यातून एक मार्ग म्हणजे वाट- मारी.अंडी,पिल्ले,अधू प्राणी, स्वतःचे रक्षण करता येत नाही, पळून जाता येत नाही असे जीव शोधून त्यांना स्वाहा करणे. इतर कोणी केलेली. शिकार हिसकावून

१३४ / नराचा नारायण