पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थाल या ठिकाणी एका खाणीत जॉन कार्ल फुलरॉफ या शिक्षकाला हा सांगाडा सापडला.सांगाडा म्हणजे प्रयोगशाळेत कवटीपासून पावलापर्यंतची सर्व हाडे तारेने गुंफून टांगून ठेवतात तशा उत्तम स्थितीत मुळीच नव्हे, तर कवटी नि काही हाडे विस्कळित पडलेली.दुसरा महत्त्वाचा शोध १८९४ सालचा.युजीन ड्युबुभा या डच डॉक्टरला वाटत असे की, जावा ( इंडोनेशिया) बेटावरील भूगर्भाची स्थिती पुरातन मानवाची हाडे सापडण्याला अनुकूल आहे.जावा बेट त्यावेळी डच साम्राज्यात होते.ड्युबुआ डॉक्टर म्हणून लष्करात भरती झाला आणि जावा इथे गेला.त्याला थोड्या प्रयत्नानंतर सांगाडे सापडले. १९२० साली पेकिंगजवळ असेच फॉसिल्स सापडले.१९२४ साली दक्षिण आफ्रिकेतही फार वेगळ्या प्रकारचे मानवी फॉसिल्स आढळले.हे सर्व जीव आजच्या मानवापेक्षा बरेच वेगळे होते.पण त्यांचे माकडांशी साम्य त्याहूनही कमी आहे.या शोधांमधे सापडलेल्या हाडांची संख्या फार लहान आहे.उदाहरणार्थ पेकिंगजवळ सापडलेल्या हाडांमधून सुमारे ४० सांगाडे बनू शकतील.शास्त्रज्ञांनी या सर्व शोधांवरून माणसाच्या घडणीचे बनवलेले कोष्टक नि काळ पुढीलप्रमाणे आहे.
 दक्षिण आफ्रिकेतील मानव (ऑस्ट्रेलोपिथेकस ) ९ लाख वर्षांपूर्वी.
 जावा मानव ७ लाख वर्षांपूर्वी.
 पेकिंग मानव ६ लाख वर्षांपूर्वी.
 निअँडरथल मानव २ लाख वर्षांपूर्वी.
 सुमारे १ लाख वर्षांपूर्वी निअँडरथाल मानव नष्ट झाला.त्याची जागा क्रोमॅग्झॉन मानवाने घेतली.

 दक्षिण आफ्रिकेतला मानव सुमारे ५ फूट उंचीचा होता.त्याचे डोके फार लहान म्हणजे अर्धा लिटर (५०० घनसेंटिमीटर) घनफळाचे होते.हा दोन पायांवर चाल-णारा होता.याच्या अवशेषांभोवती सापडलेल्या इतर हाडांवरून दिसते की, हा शिकार करत होता.हाडे,दगड यांचा शत्र म्हणून वापर करत होता.हा गटागटाने शिकार करत असणार.त्याला अग्नी सापडला होता का ? त्याला बोलता येत होते का ? यांची उत्तरे शास्त्रज्ञांना माहीत नाहीत.पण मधून मधून एकमेकाचा खून नक्की करत होता.(म्हणजे आधुनिक मानव बनण्याकडे त्याची वाटचाल सुरू होती !) पेकिंग

माकडापासून माणूस / १३३