पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली नाही.ही प्रक्रिया फार सावकाश घडणारी आहे.दुसरा पर्याय म्हणजे प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शेकडो, हजारो पिढ्यांचा इतिहास समजा-वून घेणे. हा इतिहास कोणी पुस्तकात लिहून ठेवलेला नाही. तो शोधण्याची पद्धत म्हणजे जमिनीतील अश्मीभूत अवशेष, किंवा शीलांगभूत अवशेष किंवा फॉसिल्स तपासणे. खडकांच्या अथवा मातीच्या थरांमधे जिवंतपणी किंवा मृत गाडले गेलेले जीब भूगर्भाच्या अभ्यासकांना सापडतात.त्या शरीराचे मांसल किंवा मऊ भाग झडून गेलेले असतात आणि सांगाडे तेवढे दिसतात.कचित नुसते ठसेसुद्धा मिळतात. डार्विन हा मुळात भूगर्भशास्त्राचाच अभ्यासक होता.पण डार्विनच्या काळापर्यंत,उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या अवस्थांमधे असलेले 'मानवी' सांगाडे फारसे सापडलेले नव्हते.त्यामुळे डार्विनचे प्रतिपादन हे आजचा मनुष्य आणि आजचे प्राणी यांच्या-तील साम्य नि फरक यांच्यावर व तर्कावर आधारलेलं होतं.
 आज भूगर्भशास्त्राच्या आणि फॉसिल्सच्या अभ्यासातून जीवांच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील ठळक टप्पे खूप समाधानकारकपणे निश्चित झाले आहेत.पृथ्वीचे वय सुमारे ४५० कोटी वर्षांहूनही जास्त आहे.सर्वात जुने तुरळक फॉसिल्स ३०० कोटी वर्षांपूर्वीचे आहेत.( एकपेशीय अल्गे) मोठ्या प्रमाणावर आणि विविध तऱ्हेच्या जीवांचे फॉसिल्स सापडतात तो काळ ६० कोटी वर्षांपूर्वीचा आहे.५० कोटी वर्षा-पूर्वी जलचर सृष्टी पुष्कळ विकसित झालेली होती. सरपटणारे प्राणी, बेडकासारखे जल-स्थलचर प्राणी ३५ कोटी वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर वावरू लागले.पक्षी आणि जमिनीवरचे कीटक २३ कोटी वर्षांपूर्वीपासून आढळतात.अँजिओोस्पर्म ( फुले येणाऱ्या ) वनस्पती १३ कोटी वर्षांपूर्वी उदयाला आल्या.सुमारे १.५ कोटी वर्षां- पूर्वी पृथ्वीवरील वातावरणात बदल झाले.जंगलांचा व्हास झाला.झाडांवर राहून फळे, फुले,पाने आणि चवीला किडे खाणान्या प्राण्यांपैकी काहींना गवताळ प्रदेशात उतरावे लागले.यांच्यातून मनुष्यजात विकसित झाली.झाडावरच राहिलेल्या प्राण्यांच्या उत्क्रांतीतून माकडे तसेच गोरिला, चिंपांझी, ओरांगउटान वगैरे तथाकथित एप्स यांची निर्मिती झाली.

 डार्विनच्या काळात लोकांना मानवाचा फार पुरातन सांगाडा सापडल्याची एक घटना माहीत होती. १८५६ साली जर्मनीमधे डथसेलडॉर्फ या शहराजवळ निलँडर-

१३२ / नराचा नारायण