पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण नववे माकडापासून माणूस उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताला कधी ना कधी तरी 'माणूस कसा घडला ? ' या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करावाच लागणार हे चार्लस डार्विनला पक्के ठाऊक होते. हे उत्तर बऱ्याच जणांना रुचणार नाही असाही त्याचा कयास होता. 'ओरि- जिन ऑफ स्पेसीज' या पुस्तकात डार्विनने या प्रश्नाला बगाल दिली. तशी दोन- तीन कारणे होती. भाधीच हे पुस्तक म्हणजे सहा-सातशे पानांचा ग्रंथराज झाला होता. शिवाय हा नाजुक विषय काळजीपूर्वक, तपशीलवार आणि ठामपणे मांडण्याची गरज होती. आणि माणसाच्या उत्क्रांतीबाबत पुरावे आणि आधार तसे मर्यादितच होते. पुरावे असतात तरी कोणकोणत्या प्रकारचे ? प्रत्यक्ष निरीक्षण. उत्क्रांतीच्या प्रत्यक्ष निरीक्षणावर फार मर्यादा पडतात. डार्विनने, किंवा अन्य कोणीसुद्धा, एका जातीचा प्राणी अथवा एका जातीची वनस्पती, दुसऱ्या जातीत नैसर्गिकपणे उत्कांत होताना माकडापासून माणूस / १३१