पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर त्यांच्यात होणारी वाढ या जंतूंमुळे झाली असेल.सुरुवातीचे जीव अगदी थोड्या जीन्सनी घडले होते.गेल्या शंभर कोटी वर्षांत जी उत्क्रांती झाली तिच्यातून दहा लाखाच्या आसपास जीन्स असलेले जीव घडले आहेत.म्हणजे सुमारे हजार वर्षा -मागे एका जीनची भर पडत गेली आहे.या इतक्या जीन्स आल्या कोठून ? धूम- केतूवरून आलेले व्हायरस पेशीच्या आत शिरून तिच्या केंद्रभागात जीन्सची ( किंवा डीएन्एची ) भर घालू शकतात हे आज प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे.या व्हायरसमुळेच इथली उत्क्रांती झाली असावी.उत्क्रांतीचा वेग नेहमीच सारखा राहिलेला नाही.काही काळात फार प्रचंड गतीने बदल झाले आहेत तर काही काळात जीव बरेचसे कायम स्वरूपात राहिले आहेत.याचे कारण वैज्ञानिकांना उलगडलेले नाही.जर अवकाशातून पडणान्या जंतूंच्या वर्षावामुळे उत्क्रांती होत असेल तर त्या वर्षावाचे प्रमाण जसे कमी-जास्त होईल, तशी उत्क्रांतीची गती बदलेल.चार्लस्डा र्विनचा भूगर्भशास्त्रज्ञ मित्र चार्लस् लाइल म्हणत असे की पृथ्वीवरील परिस्थितीमधे उलथापालथ होण्याचे थांबल्यानंतर खरे तर जीवांमधे फार बदल व्हायला नकोत.पण प्रत्यक्षात उलट दिसते.या कोड्याचे स्पष्टीकरण असे देता येईल की,पृथ्वीवरील उलथापालथी संपल्या,तरी उत्क्रांतीच्या चाकाला जंतूंच्या वर्षावामुळे मिळणारी गती कमी होण्याचे कारण नाही.
 हॉइल - विक्रमसिंघे यांचा सिद्धांत अजून नवा आहे.सर्वमान्य झालेला नाही.जगभर अनेक शास्त्रज्ञ आपापल्या दृष्टिकोनातून त्याची पुढील अनेक वर्षे छाननी करतील बहुसंख्य शास्त्रज्ञांना तो मान्य होईपर्यंत तज्ज्ञांव्यतिरिक्त इतरांनी त्याबद्दल पक्के मत बनवण्याचे कारण नाही.परंतु हा सिद्धांत आकर्षक आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा वाटतो एवढे निश्चित.
 धूमकेतू-उल्का -उत्क्रांती यांच्या अन्योन्य संबंधाबाबत आणखी एक कल्पना अलीकडे मांडली जात आहे.ती अशी की,उत्क्रांतीच्या गाड्याला गती देण्याची कामगिरी उत्कांनी केलेली असावी.

 आजवर सर्वसाधारण कल्पना अशी की,उत्क्रांतीची प्रक्रिया जीवांच्या निर्मिती-काळापासून आजपर्यंत थोड्या फार फरकाने सातत्याने चालू आहे.काही शास्त्रज्ञांच्या मते याउलट फार मोठे चढउतार झाले असावेत.कारण फॉसिल्स किंवा शीलांगभूत

१२८ / नराचा नारायण