पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागले की,घर सोडून जा असा इशाराही त्यात दिला आहे.उंदीर आणि प्लेग यांचा हा संबंध युरोपियनांच्या लक्षात येण्याला आणखी कित्येक शतके जावी लागली.चौदाव्या शतकापासून पुढे तीनशे वर्षे युरोपला प्लेगचे फटके बसत होते.१६६४ साली लंडनमधे शेवटची साथ आली.त्यानंतर २३० वर्षे प्लेग जगातून गुप्त झाला तो १८९४ साली चीनमधे दिसला.१८९६ ते १९१७ या काळात भारतात प्लेगने सव्वा कोटी लोक मेले.पुण्याला चाफेकर बंधूंच्या हातून रँडचा खून झाला तो याच साथीच्या संदर्भात.
 कॉलऱ्याचे वर्णन इ.स. १५०० पूर्वीच्या लिखाणात सापडत नाही.१८९७ साली भारतात कॉलयाची मोठी साथ आली.पुढे तीस वर्षे जगाला कॉलयाची बाधा झाली.रोग्यांमधे मृत्यूचे प्रमाण १५% होते.१८५० नंतर भारतासारखे काही सोडले तर कॉलरा नव्हता.१९६१ साली मागास देशांमधे कॉलन्याची मोठीच साथ आली.यावेळी जंतूंचा मोठा पाऊस पडला असणार.
 इजिप्तमधे तीन हजार वर्षांपूर्वी देवीचा प्रादुर्भाव होता. वैदिकवायत देवी-रोगाविरुद्ध लस कशी टोचावी याचे वर्णन आहे.'फोडातील थेंबभर द्राव सुई हाताला टोचून रक्तात मिसळावा.थोडासा ताप येतो.पण काळजी करू नये.' पण ख्रिस्तपूर्व ६०० वर्षे वा आसपास लिहिलेल्या चरक संहिता आणि शुश्रुत संहिता या प्रभात मात्र त्याचा उल्लेखही नाही.
 काही रोग पूर्वी असावेत आणि आता कोणाला माहीत नाहीत असाही प्रकार दिसतो.ग्रीकांच्या इतिहासात ख्रिस्तपूर्व ४३१ ते ४०४ अशी सत्तावीस वर्षे लढल्या गेलेल्या एका महायुद्धाचे एक अत्यंत तपशीलवार वर्णन उपलब्ध आहे.यात अथेन्स-मधे आलेल्या एका विचित्र साथीचे हृदयद्रावक वर्णन केलेले सापडते.पण ती लक्षणे आज वैद्यकशास्त्राला ज्ञात नाहीत.

 यात प्रचंड डोकेदुखी, डोळे-घसा- जीभ लालबुंद होणे, श्वासाला घाण येणे,शिंका,भरपूर खोकला,उलट्या,कोरड्या ओकाया,तडफडणे,ताप अजिबात नसणे,पण रोग्याला अंगावर चिंधीचासुद्धा त्रास होणे,नागने राहण्याची इच्छा,पाण्यात उडी मारण्याची इच्छा,अंगावर फोड व व्रण,अजिबात न भागणारी तहान,अशी लक्षणे एकामागून एक दिसत,आठ दिवसांत रोगी दगावे.नाहीतर जुलाब होऊन शक्ति-

धूमकेतूंचे आव्हान / १२५