पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अनेक शाळांच्या वसतिगृहांचाही अभ्यास करण्यात आला.एका वसतिगृहाच्या ८५ खोल्यांमधे प्रत्येकी ४ विद्यार्थी राहत असत.यांच्यापैकी ४८ फ्लूने आजारी पडले.संसर्गाचा परिणाम होत असेल,तर एकाच खोलीत बरेचजण आजारलेले असण्याची शक्यता खूप.उलट मैदानात खेळताना वगैरे जंतू शरीरात जात असतील तर आजारी विद्यार्थी सगळीकडे सारखे पसरायला हवेत आणि संभाव्यतेच्या नियमा-नुसार ३१ खोल्यांमधे एक एक आजारी विद्यार्थी,७ खोल्यांमधे दोन दोन तर एका खोलीत तीन विद्यार्थी आजारी दिसतील.प्रत्यक्षात ३५ खोल्यांमधे एक एक,५ खोल्यांत दोन-दोन आणि एका खोलीत तीन आजारी विद्यार्थी आढळले.निष्कर्ष : फ्लू संसर्गाने झाला नाही.
 पोलिओ हा व्हायरसपासून होणारा रोग संसर्गजन्य मानला जातो.उत्तर ब्राझील-मघे अत्यंत घनदाट जंगलात ट्रिओ नावाचे आदिवासी राहतात.या भागात अगदी परवापर्यंत गोज्या माणसाचा प्रवेश झाला नव्हता.निसर्ग फार प्रतिकूल.शिवाय हे आदिवासी लोक परक्या घुसखोरांची निर्घृणपणे हत्या करून टाकत.गेल्या काही वर्षांत या भागातल्या जंगलांची तोड सुरू झाली.आता गोरे लोक आणि ट्रिओ आदि-वासी यांचा परिचय झाला आहे.ट्रिओमधे संशोधकांना जुने पोलिओग्रस्त लोक भेटले.इथे पोलिओ कुठून भाला ? बाहेरच्यांचा संसर्ग शक्य नव्हता.हा रोग आदिवासींवर आभाळातूनच कोसळला असणार.पाश्चात्य देशात प्रतिबंधक लस टोचून पोलिओ हृदपार करण्यात आलेला आहे.पण इतरत्र उदाहरणार्थ,भारत,श्रीलंका यांच्यात तो आहे.याचा अर्थ अजूनेही पोलिओचा पाऊस सतत पडत असणार.त्यामुळे युरोपिय नांनी प्रतिबंधक लस टोचणे थांबवले की,पोलिओ पुन्हा अवतरेल.

 साथीच्या रोगांचा इतिहास पाहिला तर वारंवार असे दिसते की, रोग अवतीर्ण होतात,मग पृथ्वीवरून अदृश्य होतात आणि दीर्घकाळानंतर पुन्हा अवतरतात.प्रत्येक नवीन अवतार ही अवकाशातून मिळालेली नवी मेट असे मानायला हरकत नाही.प्लेगचे उदाहरण घ्या.खिस्तोत्तर पहिल्या शतकात सीरिया आणि उत्तर आफ्रिकेत प्लेगची साथ आली होती.त्यानंतर ५०० वर्षे प्लेगचा उल्लेख सापडत नाही.सहाव्या शतकात उत्तर आफ्रिका आणि दक्षिण युरोपात प्लेगने कोट्यावधी लोक मेले,याच काळात लिहिलेल्या भागवत पुराणात प्लेगचे वर्णन आहे. घरात उंदीर मरून पडू

१२४ / नराखा नारायण