पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सर्दीच्या व्हायरसच्या प्रसाराची तज्ज्ञांनी फार तपशीलवार अभ्यास केलेला आहे.आपण जास्त ओल्यात राहिलो, डोके नीट पुसले नाही तर सर्दी होते असा एक सार्वत्रिक समज आहे.थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात सर्दी जास्त असते असा सार्वत्रिक अनुभव आहे.या गोष्टींची सत्यता पडताळून पहाण्याकरता इंग्लंडमधे काही खास प्रयोग करण्यात आले.उदाहरणार्थ १.यात सहा स्वयंसेवकांना अंघोळ करून अंग न पुसता थंड खोलीत सहन होईल तोवर बसवून ठेवण्यात आले.फार त्रास होऊ लागल्यावर त्यांनी कपडे घातले.पण पायात ओले मोजेही घातले. यातल्या कुणालाच सर्दी झाली नाही.२.आणखी सहा स्वयंसेवकांना सर्दीच्या व्हायरसची इंजेक्शने देण्यात आली. यांच्यापैकी दोघांना सर्दी झाली.३.शेवटच्या सहा लोकांना सर्दीची इंजेक्शने देऊन शिवाय पहिल्या प्रयोगाप्रमाणे ओलाव्यात ठेवण्यात आले.यांच्यातील चार जणांना सर्दी झाली.अशा प्रकारच्या प्रयोगातून असे दिसले की,ओळाव्यामुळे सर्दीचे जंतू अधिक परिणामकारक होतात.खूप सर्दी झालेल्या लोकांना सर्दी न झालेल्या गटात मुद्दाम मिसळायला लावून पाहिल्यावर असे लक्षात आले की संसर्गाने सर्दी होत नसावी.मग सर्दीच्या लाटा का निर्माण होतात ?कारण हिवाळा आणि पावसाळा या ऋतुमानात वातावरण सर्दीच्या जंतूंना जमिनीवर येण्यास आणि माणसांवर हल्ला करण्यास अनुकूल असते.

 इन्फ्लुएंझा हा सर्दीपेक्षा कितीतरी जास्त गंभीर आजार आहे.युरोपात पहिल्या महायुद्धात झालेल्या मृत्यूपेक्षा जास्त संख्येने माणसे १९९८ साली इन्फ्लुएंझाने मेली.१९१७-१९१९ या काळात भारतात फ्लूमुळे सुमारे दोन कोटी लोक मृत्युमुखी पडले असावेत.युरोपात १७३२-३३, १७८१-८२, १८००-१८०२, १८३०-३३, १८४७-४८, १८५७-५८,१८८९-९० या काळात फ्लूच्या जबरदस्त साथी आल्या.याशिवाय आणखी दहा वेळा लहान प्रमाणात साथी आल्या.या सगळ्या काळात फ्लू फार झपाट्याने पसरत असे.पहिल्या महायुद्धाच्या वेळी मुंबई आणि बॉस्टनला एकाच दिवशी फ्लूची लागण झाली.पण बॉस्टनहून केवळ १०० मैलांवर न्यूयॉर्क शहरात मात्र पुढे महिनाभर फ्लू नव्हता.शिकागोपासून चाळीस मैलांवर फ्लूची साथ थबकली.शिकागोत लागण होण्याला आणखी महिना लागला.युरोपात माणसांच्या छोट्या वस्त्यांपासूनसुद्धा दूर एकाकी राहणाज्या मेंढपाळांना फ्लूने

१२२ / नराचा नारायण