पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अलगद सुखरूप जमिनीवर पोचू शकतील.पण - घोका एवढ्यानेही संपलेला नाही.ऑक्सिजनच्या संपर्कामुळे बहुतेक सगळे ॲनरोबिक बॅक्टीरिया मरून जातील.पण गुणबदलाने त्यातले काही ऑक्सिजनपासून बचावले जातील.
 हे जंतू जमिनीवर येताना ढगासारख्या माध्यमातून गटाने येतील.काही लहान ढग तर काही मोठे हवामानातील फरकानुसार काही लवकर खाली येतील तर काही उशिरा.एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांपेक्षा प्रवासी या ढगांच्या संपर्कात येण्याची शक्यता जास्त म्हणून प्राण्यांमधे पक्षी,विशेषतः हजारो मैल स्थलांतर करणारे पक्षी या जंतूंच्या तावडीत जास्त सहज सापडतील.यावरून असा तर्क करता येईल की,रोगजंतूंना सतत तोंड द्यावे लागल्यामुळे पक्ष्यांमधे अशा रोगांना प्रतिबंध करण्याची शक्ती जास्त असेल.फ्लू व्हायरसचा अभ्यास करणारांना असा पुरावा सापडला आहे.

 रोगजंतूंचा असा वर्षाव पृथ्वीवर होत आहे हे सिद्ध करणारा प्रत्यक्ष पुरावा मिळेल काय ? याला तीनचार मार्ग दिसतात.१. धूमकेतूंवर जाऊन तेथील पृष्टभाग खणून नमुने आणणे आणि त्यात जंतू शोधणे.पण हे आजतरी अशक्य आहे.२. विमाना-तून अति उंचावर जाऊन तिथल्या हवेचे वा हवेतून पडणाऱ्या कणांचे नमुने आणणे नि तपासणे.पण पृथ्वीवर होणाऱ्या वर्षावामधे जंतूंचे प्रमाण अत्यल्प असेल.उदा-हरणार्थ या वर्षावाचे १० कोटी हिस्से केले तर त्यातील एक हिस्सा फ्लूचे जंतू असण्याची शक्यता आहे.तेव्हा प्रत्यक्ष जंतू शोधणे हे काम धान्य महामंडळाच्या राक्षसी गोदामात हरवलेली टाचणी शोधण्यासारखें अवघड आहे.३.जंतूंचा वर्षाव सगळीकडेच होत आहे.तो ध्रुवप्रदेशात नि ग्रीनलंडसारख्या कायम गोठून राहिलेल्या भूभागातही होत असेल.त्या जमिनीवर हे सूक्ष्मजीव अतिदीर्घकाळ गोठलेल्या अवस्थेत राहत असतील.तो बर्फ तपासून पाहावा.पण टनावारी बर्फातून व्हायरसचे कण वेगळे करणे हेसुद्धा फार दुर्घट काम आहे. शिवाय तार्किक दृष्ट्या यात एक अडचण आहे.समजा व्हायरस सापडलाच तर तो धूमकेतूवरून भाला हे कसे ठरवायचे ? तो आधीच पृथ्वीवर नव्हता असे कशावरून म्हणायचे ? तात्पर्य, ही दिशासुद्धा निरुपयोगी आहे.४. या रोगजंतूंचा माणसावर होणारा परिणाम तपासून काही निष्कर्ष निघू शकतील.हॉइल आणि विक्रमसिंघे यांनी हाच प्रयत्न केला.

१२० / नराचा नारायण