पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केतूच्या पोटातील सूक्ष्मजीवही जातील.या वायुरूप भागातून ते पृथ्वीकडे ओढले जातील.पृथ्वीवर अंतरीक्षातून अशा प्रकारे अनेक गोष्टींचा सतत वर्षाव होत असतो.यांपैकी छोटे मोठे दगड ( मीटिओोराइटस् किंवा उल्का ) सर्वांना माहीत असतात.असा वर्षाव सर्वच ग्रह आणि उपग्रहांवर होत असणार.उदाहरणार्थ चंद्र.पण गुरु-त्वाकर्षणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर हे सर्व पदार्थ अतिवेगाने आदळतात नि त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात.

 पृथ्वीवर मात्र असे घडत नाही.गुरुत्वाकर्षणाने ओढला जाणारा कण जर फार लहान असेल तर हवेमुळे त्याचा वेग कमी केला जाऊ शकतो.पण याच कारणामुळे अवकाशातून पृथ्वीकडे येणारे पदार्थ हवेशी होणान्या घर्षणातून प्रचंड तापतात.या अग्निदिव्यातून वाचण्यासाठी कणाचा आकार फार लहान असणे आवश्यक आहे.एरवी तो जळून जातो आणि आपल्याला तुटलेला तारा म्हणून दिसतो.खगोल-शास्त्रज्ञांच्या हिशोबानुसार एक मायक्रॉन ( एक मीटरचा एकदशलक्षांश किंवा एक मिलिमीटरचा एक सहस्रांश ) आकाराचे कण या प्रक्रियेतून वाचतील.पृथ्वीवर सापडणारे गोलाकार बॅक्टीरिया ( स्टेफॅलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस वगैरे ) यांचा व्यास अर्धा मायक्रॉन इतका असतो.कणाचा आकार जर सळईसारखा असेल आणि जाडी एक मायक्रॉनपेक्षा कमी असेल तर लांबी जास्त असूनही त्याला हवेच्या घर्षणातून वाचता येईल.पृथ्वीवर सापडणारे अनेक सळईच्या आकाराचे बॅक्टीरिया या मापात बसतात.उदाहरणार्थ क्षयाचे जंतू (जाडी ०.३, लांबी ३-० ),एश्चेरीकिया कोलाय किंवा ई. कोलाय हे माणसाच्या पोटात कायम वस्ती करणारे बॅक्टीरिया (जाडी ०.५, लांबी ३ ते ५), प्लेगचे जंतू (जाडी ०.७, लांबी १.५),धनुर्वाताचे जंतू ( ०.५, लांबी २ ते ३), कुरळ्या केसांसारखे कॉलरा जंतू (जाडी ०.५ तर लांबी २ ते ३).व्हायरस हे अर्थात यांच्याहूनही पुष्कळच लहान असतात.जनावरांना होणाऱ्या लाळेच्या ( फुट अँड माउथ डिसीझ ) रोगाला कारणीभूत असणारे व्हायरस आणि ०.५ मायक्रॉन व्यासाचे स्टेफलोकॉकाय बॅक्टीरिया यांची तुलना केली तर असे दिसेल की,व्हायरस या लिखाणातल्या पूर्णविरामाएवढा आहे तर बॅक्टीरिया काड्या पेटीतल्या काडीएवढा.तेव्हा व्हायरस आणि बॅक्टीरिया धूमकेतूपासून अलग होऊन पृथ्वीकडे आले तर गुरुत्वाकर्षण आणि हवेचा पर यांच्या एकत्र परिणामामुळे

धूमकेतूंचे आव्हान / ११९