पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डी. एन्. ए. चे कणही बनले आणि त्यांची वाढ सुरू झाली. यातून पुढे एकपेशीय बहुपेशीय प्राणी आणि वनस्पती यांची निर्मिती झाली.
 या प्रचलित कल्पनांना धक्के देणारे विचार गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉइल आणि त्यांचे सहकारी चंद्र विक्रमसिंघे यांनी मांडले आहेत.या विचारांची ओळख आता करून घ्यायची आहे.हॉइल - विक्रमसिंघे यांच्या मते पृथ्वीवर सुरुवातीला बनणारी कार्बनची संयुगे ऑक्सिजनच्या क्रियेने नष्ट होतील.त्यामुळे पृथ्वीवर आपसूक जीव निर्माण होणे अवघड आहे.उलट खगोल-शास्त्रातील निरीक्षणावरून असे दिसते की अंतरीक्षामधे, जीवांच्या घडणीला आव-श्यक अशा किमान तीस प्रकारच्या संयुगांचा मोठाच साठा आहे.तेथे ऑक्सिजन नसल्यामुळे ती संयुगे सुरक्षित राहतात.सेल्युलोज हे वनस्पतींमधे फार मोठ्या प्रमाणात सापडणारे द्रव्य आहे.तेसुद्धा अंतरीक्षात आढळते.

 सूर्यमंडलाची निर्मिती सुमारे ५०० कोटी वर्षांपूर्वी झाली असावी.या मंडळाच्या सीमेवर, म्हणजे सूर्यापासून खूप दूर, लक्षावधी धूमकेतू होते.त्यांचा पृष्ठभाग सतत गोठलेला होता.अवकाशात निर्माण झालेली संयुगे,यथा काष्ठंच काष्ठंच,या गोठ-लेल्या पृष्ठभागावर जाऊन पडली.तेथे धूमकेतूंच्या परस्पर टकरीमुळे किंवा रसा-यनांच्या परस्पर क्रियेमुळे मधून मधून उष्णता निर्माण झाली.त्या उष्णतेचा परिणाम म्हणून धूमकेतूंच्या पृष्ठभागावर प्रचंड विस्ताराचे उबदार तलाव निर्माण झाले.यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर जीवरासायनिक संयुगे मिसळलेली होती.अशी स्थिती लक्षावधी वर्षे राहिली.कारण धूमकेतूच्या पृष्ठभागापासून शेकडो मीटर खोल असलेल्या भागातील उष्णता बाहेर फेकली जाण्याचा वेग फार कमी असतो.या तलावांचा पृष्ठ-भाग गोठून गेला.पण त्यांच्या पोटात या संयुगांच्या परस्पर प्रक्रिया होत राहिल्या.त्यातून डीएन्एचे कण निर्माण झाले आणि शेवटी व्हायरस आणि बॅक्टीरिया हे सूक्ष्म जीव घडले.हे बॅक्टीरिया ऑक्सिजनशिवाय जगणारे (ॲनरोबिक) असणार.( असे बॅक्टीरिया पृथ्वीवर आहेत.गोबर गॅस प्लॅटमधे शेणापासून मिथेन तयार करणारे बॅक्टीरिया असेच असतात.)असे घूमकेतू पृथ्वीजवळ आले असता (म्हणजेच सूर्याच्याही बरेच जवळ असताना ) सूर्याच्या उष्णतेमुळे त्यांचा पृष्ठभाग वितळला जाऊन त्यांची वाफ धूमकेतूच्या शेपटासारख्या भागात जाईल.या वाफेबरोबर धूम-

११८ / नराचा नारायण