पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यानंतर बिजू पटनाईक यांच्या मदतीने त्याने भुवनेश्वरला एक वेगळी विज्ञानसंस्था काढली.इथे काम करतानाच त्याचा अंत झाला.ही संस्था नावारूपाला येण्याला वेळ मिळाला नाही.त्याच्याभोवती गोळा झालेले तरुण कर्तृत्ववान भारतीय शास्त्रज्ञ पांगळे.भारताच्या विज्ञानक्षेत्रात होऊ घातलेला एक अभिनव वैज्ञानिक प्रयोग अपुरा राहिला.
 हाल्डेनने प्रतिपादन केले की, पृथ्वीवरील सर्व कोळसा हा फार पूर्वी गाडलेल्या वनस्पतींपासून बनला आहे. म्हणून वनस्पतींच्या घडणीपूर्वी तो कार्बन-डाय-ऑक्सा-इड वायूच्या स्वरूपात असावा.ऑक्सिजनही वनस्पतीमुळे वेगळा होतो. तेव्हा फार पूर्वी वातावरणात ऑक्सिजन नसावा.( आज खगोलशास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार व्हीनस आणि मार्स किंवा बुध आणि शुक्र यांच्यावरील हवा बव्हंशी कार्बन-डाय-ऑक्साइड वायूच्या स्वरूपात आहे.) पूर्वी ऑक्सिजनच नव्हता म्हणून त्यापासून बनणारा ओझोनही नसणार.आज पृथ्वीभोवतालचा ओझोनचा थर पृथ्वीकडे येणारे अतिनील किरण (अल्ट्राव्हायोलेट ) अडवतो. पूर्वी ते थेट पृथ्वीवर पोचत असणार.या किरणांच्या परिणामामुळे पृथ्वीवरील पाणी,नायट्रोजन, कार्बन-डाय-ऑक्साइड हे पदार्थ एकत्र येऊन सेंद्रीय (ऑरगॅनिक) पदार्थ बनले असावेत आणि त्यांच्या-पासून जीव बनले असावेत.आज अतिनील किरण येत नाही. शिवाय जर सेंद्रीय पदार्थ बनले तर ऑक्सिजनचा परिणाम म्हणून त्यांचे ज्वलन (ऑक्सिडेशन ) होते.म्हणून स्वयंभू जीवनिर्मिती दिसत नाही.ओपॅरिनच्या मांडणीत तपशिलाचा फरक असा होता की, त्याच्या मते पूर्वीच्या हवेत हैड्रोजन,अमोनिया,मिथेन हे वायूसुद्धा असावेत.(आज लोकांना ओपॅरिनचे म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते. )

 या सगळ्या तर्काला प्रयोगसिद्ध पुराव्याचा पाठिंबा मिळाला तो १९५२ साली.हॅरोल्ड क्लेटर युरी या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली स्टॅन्ले लॉइड मिलर या विद्यार्थ्याने अशा तऱ्हेचा प्रयोग केला.त्यात पाणी,अमोनिया, मिथेन आणि हैड्रोजन यांच्या मिश्रणामचे वीजप्रवाह सोडला.एक आठवडा या मिश्रणावर विजेची किया चालू होती. नंतर तपासणी केल्यावर आढळले की,या मिश्रणातून विजेमुळे काही अमिनो अॅसिड या प्रकारात मोडणारी सेंद्रीय द्रव्ये तयार झाली होती.अमिनो अॅसिडपासूनच प्रथिने बनतात आणि प्रथिने जीवसृष्टीचा फार महत्त्वाचा

११६ / नराचा नारायण