पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रसायन शास्त्रातही प्रगती झाली होती.प्राणी भाणि वनस्पतींमधील मुख्य पदार्थ म्हणजे प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर वगैरे मूल- द्रव्यांपासून बनणारी अत्यंत गुंतागुंतीची संयुगे आहेत.या संयुगांच्या एकेका अणू- मधे हे वेगवेगळे परमाणू लक्षावधींच्या संख्येने आणि विशिष्ट रचनेने बांधलेले असतात. एवढा सगळा क्लिष्ट प्रकार निव्वळ योगायोगाने झाला असावा ?
 १९०८ साली स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ स्वाँट ऑगस्ट आम्हेनिअस याने सिद्धांत मांडला की, जीवतत्त्वाने भरलेले कण विश्वाच्या पोकळीत कायमच तरंगत असावेत.तेच अधूनमधून वेगवेगळ्या ग्रहांवर पडून जीव वाढू लागत असतील. यावर इतरांनी ऑडिट काढले की, विश्वाच्या पोकळीत सतत विश्वकिरणांचा भडीमार चालू असतो.त्यांच्या तडाक्यातून वाचून जिवंत राहणे केवळ अशक्य आहे.म्हणजे सुरुवात पृथ्वीवरच व्हायला हवी.
 पण एकदा स्वयंभूपणे जीवांची सुरुवात होऊ शकते असे मानले तर प्रश्न निघतो की एकदाच का ? अशी सुरुवात अनेकदा व्हायला हवी. आजही व्हायला हवी.पण आज स्वयंभूपणे जीव बनल्याचे कुठेच दिसत नाही.याला उत्तर असे की, कदाचित योग्य परिस्थिती आता उरली नसेल.कदाचित जीवस्त्ररूप मिळण्याच्या जवळपास रचना आली की, इतर प्राणी अशा पदार्थांवर झडप घालून, खाऊन त्यांचा खुर्दा करत असतील.

 पृथ्वीच्या इतिहासात सुरुवातीला परिस्थिती वेगळी होती.तिच्या संदर्भात जीव- निर्मितीचा सिद्धांत दोन शास्त्रज्ञांनी १९२० च्या सुमारास मांडला. अलेक्झांडर इव्हानोविच ओपॅरिन या रशियन शास्त्रज्ञाची ही मांडणी इतरांना ज्ञात नव्हती.१९३७ साली त्याचे पुस्तक इंग्रजीत भाषांतरित झाल्यावर तो इतरांना ठाऊक झाला.त्याला समांतर असा सिद्धांत स्वतंत्रपणे मांडणारा दुसरा शास्त्रज्ञ जॉन बर्डन सँडरसन हाल्डेन.( १८९२ - १९६४). जे. बी. एस. हाल्डेन हा ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ कम्युनिस्ट पक्षाचा कार्यशील सदस्य पक्षमुखपत्राचा संपादक.याने आयुष्यभर विज्ञानाच्या व्यासंगाबरोबरच पुराणमतवाद आणि नात्सीवाद, फॅसिझम यांच्याविरुद्ध कडवा लढा दिला. १९५५ साली हाल्डेन भारताचे नागरिकत्व पत्करून कलेकत्त्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटयूटमधे सामील झाला.तेथे मतद

धूमकेतूंचे आव्हान / ११५