पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण आठवे धूमकेतूंचे आव्हान निचे नॅचरल सिलेक्शन आणि मेंडेलची अनुवांशिकता या दोन विचारांनी उत्क्रांतीचा बहुतेक इतिहास उलगडून दाखवता येतो असे आज सर्वसामान्यपणे मानले जाते. एक महत्त्वाचा कूट प्रश्न म्हणजे निर्जीव पृथ्वीवर जीवांचे पहिले पदार्पण कसे झाले ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न पाश्चात्य जगात गेली ३०० वर्षे सतत होत आले. या शोधाचे काही महत्त्वाचे टप्पे आता पाहू. सुरुवातीला प्रचलित कल्पना अशी होती की निर्जीव स्थितीतून आपोआप, स्वयं- भूपणे जीव घडत असावेत. याला स्पॉटेनिअस जनरेशन असा शब्द वापरतात. सडू लागलेल्या मांसात किंवा फळात अळ्या ' पडतात' हा सर्वांचा अनुभव आहे. त्या अशाच स्वयंभू प्रक्रियेतून येत असतील का ? १६६८ साली इटालियन शास्त्रज्ञ फ्रान्सिस्कोरेडी याने पाहिले की, सडक्या मद्रणाभोवती माशा घोंगावतात. मटण हवा- बंद डब्यात ठेवून माशांचा संपर्क तोडला तर अळ्या पडत नाहीत. त्याने निदान ८ धूमकेतूंचे आव्हान / ११३