पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उधृत करून हे प्रकरण संपवू.

 '... फेब्रुअरी १९३३ मधे आपल्या संस्थेने मला आपले मानद सदस्यत्व बहाल केले... आपल्या संस्थेशी असलेले सर्व संबंध मी आता अत्यंत खेदपूर्वक संपवू इच्छितो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या संस्थेने अनेक प्रतिभावंत शास्त्रज्ञांना अर्धचंद्र देऊन, त्यांच्या प्रयोगशाळा बंद करून, लायसेंको नामक एका लफंग्याला आपला पाठिंबा जाहीर केला आहे आणि अनुवांशिकता शास्त्राचा धिक्कार केला आहे.जर्मनीतील उफराट्या विज्ञानाप्रमाणेच लायसेंको आणि इतरांच्या परिस्थितीने झालेल्या बदलांच्या अनुवांशिकतेवरील विश्वासाची परिणती एका भयानक निष्कर्षा- मधे होणार आहे. तो म्हणजे आजवर मागास असलेले समाज पिढ्यान् पिढ्या, अनु- वांशिकतेमुळे मागासच राहतील...माझे विज्ञान हे मान्य करत नाही... आपली संस्था पुन्हा एकदा सच्च्या विज्ञानाच्या सेवेत लागलेली मला मृत्यूपूर्वी बघावयास मिळो एवढीच इच्छा मी व्यक्त करतो.'

११२ / नराचा नारायण