पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माण करण्याच्या शास्त्राबद्दल असलेली उदासीनता, शत्रुबुद्धी हे एक महत्त्वाचे कारण असावे.१९६६ साली प्रसिद्ध भारतीय शेतीतज्ज्ञ एम्. एस्. स्वामिनाथन यांनी सोवियत संघराज्याचा दौरा करून आल्यानंतर दिलेल्या अहवालात आवर्जून सांगितले की शेतीसंशोधनाला रशियात नवी दिशा मिळत आहे. वेगवेगळ्या संशोधन संस्थां- मधे अनेक नवे प्रकल्प उत्साहाने कार्यान्वित केले जात आहेत.तीस वर्षांची दुष्ट परंपरा आता इतिहासजमा होत आहे.
 पण हे सोपे काम नव्हे. नवी पाठ्यपुस्तके, विश्वकोषामधील नवीन प्रकरणे, नव्या नियमावल्या किती गोष्टी कराव्या लागल्या असतील.वैद्यकीय संशोधनात तर जेने- टिक्स विषयाचे कोणी तज्ञच उपलब्ध नसल्यामुळे नवे प्रकल्प हाती घेणे फारच जिकिरीचे होऊन बसले होते.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भंपक, खोटारडे, प्रयोगाच्या निकषांवर न टिकणारे सिद्धांत शिकवली गेलेली पिढी कशी बदलणार ? भारतासारखा दरिद्री, मागास, असंघटित समाज, भिकेचा कटोरा हाती घेऊन पी. एल. चारशे ऐंशीसाठी अमेरिकेपुढे ओंजळ पसरणारा देश, दरवर्षी ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येइतकी भर आपल्या संख्येत घालून आपल्याच पायावर धोंडा टाकणारा देश, पण तोसुद्धा संकरित जातींचे तंत्र वापरून पंजाब, हरियाणासारख्या लहान तुकड्यातून सान्या देशाला पुरेल इतका गहू पैदा करायला लागला आणि अब- काशात भरारी मारणारा, आपल्या लष्करी सामर्थ्याने पाश्चात्यांना भिववणारा रशिया सोन्याच्या चिपा मोजून दरवर्षी गहू विकत घेत राहिला ? अशक्य वाटणारी पण खरी गोष्ट आहे ही.

 लायसेंको आणि त्याचे अनुयायी यांच्या व्याख्यानांचे वाचन करताना काही गमतीशीर गोष्टी लक्षात येतात. सगळ्यांची पद्धत सारखीच प्रथम मार्क्स, लेनिन,स्टॅलिन यांच्या आरत्या गायच्या. मग लेनिनने कौतुक केलेल्या मिचुरिन या लमार्क- बादी फलोद्यान तज्ज्ञाचे गोडवे गायचे.मग नावानिशी, मेंडेलच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्यांना लाखोली व्हायची. आणि शेवटी त्यांचे सिद्धांत चुकीचे होते नि आहेत असे जाहीर करून मोकळे व्हायचे.त्यासाठी प्रयोग, निरीक्षणे, अनुमाने यांचा तपशील द्यायचा नाही. असे प्रयोग म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीचे मैलाचे टप्पे असतात.विज्ञान हे आपण अशा प्रयोगाच्या माध्यमातूनच समजावून घेतो. वायूंचे आकारमान,

लायसैकोचा उदयास्त / १०९