पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तपमान आणि दाब यांचा संबंध दाखवणारा बॉइलचा प्रयोग, चुंबकीय क्षेत्र तोडून बीज निर्माण होते हे दाखवणारा फॅरॅडेचा प्रयोग, सापेक्षतावादाची चाहूल देणारा, प्रकाशांच्या वेगाच्या मापनाचा मायकेल्सन मोर्ले प्रयोग, गुणबदलांची शक्यता दाख- णारा टॉमस इंटमॉर्गनचा घुंगुरळ्यांवर क्ष किरणांचा मारा करण्याचा प्रयोग असे प्रयोग म्हणजे अनेक सिद्धांतांना पायाभूत असतात. लायसेंको-मिचुरिनवादाला पायाभूत असणारे असे कोणते प्रयोग आहेत या प्रश्नाला सरळ उत्तर देता येत नाही.अशा एका प्रयोगाचा तपशील वाचून तर आश्चर्यच वाटेल.शोमियान नावाचा गोपैदास केंद्रांचा मुख्य आपल्या गायी का भरपूर दूध देतात हे सांगताना म्हणतो की, एक लिटर दूध काढताना गाईची आचळे शंभर वेळा ओढावी लागतात.म्हणजे वर्षाला ६००० किलो ( रोज सुमारे १६-१७ लिटर ) दूध देणाऱ्या गाईची आचळे ६० लाख वेळा ओढली जातात. खुराका इतकेच या व्यायामाचेही दूध वाढण्यात महत्त्व आहे.पण त्याला कोणी उठून विचारत नाही की, 'बांबारे, नुसते गाईची आचळे ओढून तिचे दूध वाढेल का ? ' ' मिचुरिन आणि लायसेंको यांच्या शिकवणीनुसार आमच्या पद्धतीप्रमाणे जे कोणी गोपैदास करण्याचे प्रयत्न करतील त्यांना भरघोस यश मिळेल.' असा शेबट केला की टाळ्यांचा कडकडाट.शत्रुपक्षाचा उपहास करण्याची रीत कशी पाहा.एका वैज्ञानिक बैठकीत लायसेंको म्हणतो की, तो डुबिनिन काय संशोधन करतो? तर मॉस्कोतली घुंगुरटी आणि जंगलातली घुंगुरटी यांच्या रंगसूत्रांमधले फरक चिवडणे.युद्धकाळात याने काय केले, तर व्होरोन्येझमधल्या घुंगुरट्यांना उपासमार घडली त्यातून त्यांच्या रंगसूत्रात काय बदल झाला याचा अभ्यास.युद्धोत्तर पुन- बांधणीच्या काळात हा काय करणार तर पुन्हा खायला मिळाल्यामुळे या घुंगुरट्यांमधे काय उत्क्रांती होते याचे निरीक्षण.या सगळ्याचा आमच्या समाजविकासाला काय उपयोग होणार कपाळ ?

 लायसैकोवाधांना मॅडेलच्या जेनेटिक्समधली अत्यंत हास्यास्पद वाटणारी गोष्ट म्हणजे त्या शास्त्राचा जुगारीपणा. माता आणि पिता आपापल्या रंगसूत्रांच्या जोडीपैकी एकएक रंगसूत्र अपत्याला देणार. दोनातले कोणते रंगसूत्र मिळणार ? तर म्हणे हे नाणेफेकीने ठरेल. गुणबदल होतात ते कसे ? तर योगायोगाने जीवसृष्टीची घडण कशी होते हे नीट न कळ्यामुळे या लोकांना नाणेफेक, संभाव्यता, संख्याशास्त्र

११० / नराचा नारायण