पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दांपत्याने न्यायालयासमोर ठेवला. शिवाय मेरीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता,दोन मुलांमधे या तिसऱ्या मुलीची भर टाकण्यात मुलीचे नुकसान आहे. चांगल्या पालनपोषणाचा आणि अधिक चांगले आई-वडील मिळविण्याचा या छोट्या मुलीचा हक्क हिरावून घेतला जात आहे, असेही प्रतिपादन दांपत्याच्या वकिलाने केले,स्त्री संघटनांची या खटल्यावरची प्रतिक्रिया मोठी लक्षणीय आहे. त्या म्हणाल्या की,मूल सांभाळण्यासाठी बाई नेमणे, दाईचे दूध पाजणे यापुढची अतिविशाल पुरंध्रीची झेप म्हणजे सरोगेट मदरहूड. स्वतःचा बांधा ( form ) टिकावा, आपली नऊ महिन्यांची आणि बाळंतपणाची कटकट वाचावी यासाठी या श्रीमंत महिलांनी ही ‘ केझ' काढली, झाले ! अर्थात, स्वतःला मूल होणे अपायकारक आहे किंवा आप ल्याला निरोगी, सुदृढ अपत्य होणे असंभाव्य आहे. यामुळेही स्त्रिया हा पर्याय स्वीकारतात, याकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष झालेले दिसते.

 व्यक्तिगत पातळीप्रमाणेच सामाजिक पातळीवरही माणसाने सुप्रजाजननाचा विचार केला आहे.त्याला विज्ञानाचे अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न गेल्या शतकाअखेर इंग्लंडमधे झाला.'युजेनिक्स' ( सुप्रजाजनन ) हा शब्द प्रचारात आणला तो फ्रान्सिस गॅल्टनने.चार्लस् डार्विनचा हा आतेभाऊ.त्याने माणसातील अनुवांशिकतेचा पद्धतशीर अभ्यास केला.जुळ्या भावंडांच्या निरीक्षणातून अनुवांशिकता आणि संस्कार यांना वेगवेगळे करण्याचा प्रयत्नही त्याचाच.आधुनिक संख्याशास्त्राचा जनक कार्ल पिअर्सन आणि प्राणिशास्त्रज्ञ वेल्डन यांच्या सहकार्याने गॅल्टनने केलेले अभ्यास लक्षणीय ठरले.समाजात सद्गुणांचा परिपोष व्हावा आणि दुर्गुणांची पीछेहाट व्हावी यासाठी नियम, कायदे करावेत ही कल्पनाही त्यानेच मांडली.असे म्हटल्यावर अर्थातच सुप्रजाजनन या विषयाला राजकीय रंग चढणार.तसे झालेही.खरेतर यापूर्वीच्या युरोपीय विचारप्रणालींमधे विशेषतः क्रांतिकारक तत्त्वज्ञानांमघे मानवाच्या समतेला फार महत्त्व दिले होते.समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही फ्रेंच राज्यक्रांतीची पाया- भूत त्रयी. तिकडे अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यात असेच प्रतिपादन सापडते.सर्व माणसे जन्मतः समान आहेत.सुखासमाधानाचे स्वतंत्र आयुष्य जगण्याचा अधिकार सर्वांना परमेश्वराने दिला आहे.तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही.हे सगळे ठीक आहे हो! पण शारीरिक व बौद्धिक क्षमता, कर्तृत्व, चारित्र्य यांबाबत

९८ / नराचा नारायण