पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साठी पैसे मिळविणाऱ्या महिला अशा सर्वांचा समावेश दिसून येतो, अपत्यहीन कुटुंबाबद्दल दया येणे किंवा एक प्रकारे आपल्याला शक्य ती मदत करणे याही भावना त्या स्त्रीत असणे शक्य आहे.
 हा प्रकार गेली काही वर्षे अस्तित्वात असला, तरी तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला, तो मेरी बेथ व्हाइटहेड या भाडोत्री मातेविरुद्धच्या 'बेबी एम्' या नावाने गाजलेल्या खटल्यामुळे. मेरी बेघ व्हाइटहेड ही दोन मुलांची आई. तिच्या नवऱ्याची मिळकत तशी तुटपुंजी. एका संस्थेमार्फत मेरी एका जोडप्याशी करारबद्ध झाली, पण मुलगी झाल्यानंतर मेरीला तिचा चांगलाच लळा लागला. तिचे नाव मेरीने सारा असे ठेवले. करारानुसार ह्या छोट्या मुलीस परत करण्यास मेरी मुळीच तयार होईना. इकडे या दांपत्याने सारा आपल्याला मिळावी यासाठी कोर्टात मेरीवर खटला भरला. हा बराच गाजला. अशा प्रकारचा हा पहिलाच खटला असल्याने आणि कोणत्याच राज्यात या खटल्यास लागू पडतील असे कायदे-कानून नसल्याने सर्व अमेरिकेचे लक्ष या खटल्याने वेधून घेतले. शेवटी, न्यू जर्सीच्या न्यायालयाने ' मेरीने हे मूळ परत न करणे म्हणजे व्यक्ती-व्यक्तींमधे झालेल्या लिखित कराराचा भंग होय' अशी भूमिका घेऊन मेरीने हे मूल परत करावे असा निर्णय दिला. या निर्णयाने अमेरिकेत एकच वादळ उठले.

 काहींनी, असे मातृत्व हे ख्रिश्चन धर्म आणि नैतिक आचरण यांच्याशी पूर्ण विसंगत असल्याने त्यावर कायद्याने बंदी घालावी, असा सूर लावला. अर्थात कायद्याने बंदी घातली, तरी ती प्रत्यक्षात परिणामकारक होण्याची शक्यता कमीच. अमेरिकेतल्या स्त्री-संघटकांनी पूर्णपणे मेरीची बाजू घेतली. स्वतःच्या पोटात वाढलेल्या अपत्याशी मातेची विशेष जवळीक असते आणि अशा मातृप्रेमाची आणि त्यागाची तुलना, ज्याने केवळ शुक्रजंतू पुरविले त्याच्या प्रेमाशी करणे मूर्खपणाचे आहे. अशा अपत्यावर म्हणूनच मातेचाच संपूर्ण हक्क असला पाहिजे. तिने स्वतः होऊन असे मूल जोडप्यास दिले, तर गोष्ट वेगळी. या खटल्यातले दांपत्य बरेच श्रीमंत आहे. नवराबायको दोघेही मिळवते, प्रतिष्ठित, मेरीला त्यांच्या तोडीचा वकील देता आला नाही, याकडेही या संघटनांनी लक्ष वेधले. दांपत्यातील पत्नीला मूल होणे हे भारोग्याच्या दृष्टीने संपूर्ण- पणे अहितकारक आहे, त्यात पत्नी मरणेही शक्य आहे, असा डॉक्टरांचा निर्वाळा

सुप्रजाजनन / ९७