पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दाण होईल ! विनोद सोडा. पण एका विशिष्ट अपत्यसंभवामधे पित्याच्या कोणत्या जीन्स अपत्याला मिळतील याचा भरवसा नसल्यामुळे खरोखरीच पंचाइत आहे. अजून तरी हे सुप्रजाजनन प्रयत्न शास्त्रीयदृष्टया शक्य वाटले तरी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य झालेले नाहीत.
 पण शुक्रजंतूंच्या बँकेचे इतरही उपयोग आहेत. एखाद्या पुरुषाला नसबंदी शस्त्र- क्रिया करून घ्यायची आहे पण त्यानंतरही गरज वाटल्यास मूल होण्याची शक्यता जिवंत ठेवायची आहे. यासाठी हवे तर कापलेली नस पुन्हा जोडून घ्यायची किंवा नसबंदीच्या आधीच आपले शुक्रजंतू बँकेत गोठवून ठेवायचे आणि पुढे वाटेल तेव्हा कृत्रिमरेतन पद्धतीने वापरायचे. काही पुरुषांना कामाच्या निमित्ताने क्ष किरण, किरणोत्सर्गी पदार्थ यांच्या संपर्कात यावे लागत असेल तर कळत नकळत वृषण ग्रंथींवर परिणाम होऊन विकृत शुक्रजंतू निर्माण होण्याचा धोका असतो. तो अन्य मार्गाने टाळता येत नसेल तर अशा व्यवसायात शिरण्यापूर्वीच आपले निरोगी शुक्र- जंतू बँकेत ठेवून देता येतील.

 संतती मिळविण्याचा याहून अधिक नाट्यमय प्रकार म्हणजे मोले घातले जन्माया किंवा सरोगेट मदरहूड. आपल्या नैतिक कल्पनांना ही अमेरिकन रीत धक्कादायकच वाटेल.अशा मातृत्वामधे एखादी स्त्री एखाद्या जोडप्याशी करार करते. या करारानुसार ती त्या जोडप्यांतल्या पुरुषापासून राहिलेला गर्म पोटात वाढविते, मूल जन्माला आल्यानंतर ते त्या जोडप्यास दिले जाते. याबद्दल मोबदला म्हणून त्या स्त्रीस काही रक्कम दिली जाते. बाळंतपणाचा खर्च, इतर वैद्यकीय खर्च हाही अर्थात जोडप्याने द्यावयाचा असतो. ज्या जोडप्यांना पत्नीमधे दोष असल्याने मूल होत नसेल किंवा वैद्यकीय कारणांसाठी पत्नीने मातृत्व स्वीकारणे इष्ट नसेल, अशी जोडपी अशा कराराने मूल मिळवितात. दत्तक घेतलेल्या अपत्यापेक्षा असे अपत्य पतिपत्नी जास्त पसंत करतात. कारण त्यात पन्नास टक्के जीन्स जोडप्यातल्या पंतीचे असतात. अशा प्रकारची जोडपी आणि ही भाडोत्री माता यांना एकत्र आणणाऱ्या व्यापारी कंपन्या अमेरिकेत आहेत. सदरहू स्त्रीची शारीरिक तसेच मानसिक तपासणीही या कंपन्या करवून घेतात. अशा मातृत्वाने पैसे मिळविणाऱ्यांमधे गरीब मुली, शिक्षणासाठी पैसे जमविण्याया विद्यार्थिनी, संसारास हातभार लावणाऱ्या स्त्रिया किंवा निव्वळ चैनी-

९६ / नराचा नारायण