पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोन मूळच्या शुद्ध जाती अशा मिळवलेल्या, की त्यांच्या संकराने निर्माण होणारी कोंबडी आयुष्यभर नुसती अंडीच घालेल. आणि कोबडे ? त्यांचा काहीच उपयोग नाही. म्हणून F1 पिढीची पिल्ले पैदा झाली की इन्क्यूबेटरमधून त्यांना बाहेर काढल्याबरोबर त्यांची नर-मादी अशी वर्गवारी करायची. हे काम अनुभवी तंत्रज्ञ फार झटपट करतात. एका वेळी दोन हातात दोन पिल्ले अलगद धरतात. त्यांच्या जननें- दियांना स्पर्श करतात की, नर वेगळ्या टोपलीत आणि माद्या वेगळ्या टोपलीत गेल्याच. लगोलग सर्वांना रोगप्रतिबंधक लस टोचतात आणि पुठ्याच्या डब्यातून विमानाने बाजाराकडे रवानगी करतात. या पिल्लांच्या अंडी घालण्याच्या अनुवांशिक- क्षमतेमुळे त्यांना उत्तम किंमत येते. त्यांच्यापासून नवीन पिढी तयार झाली तरी ती FA म्हणजे बिनभरवशाची असते. तिच्यामधे F पिढीचे सर्व गुण दिसतील अशी खात्री देता येत नाही. म्हणून लोकांना पुन्हा पुन्हा या कंपन्यांकडे यावे लागते. मूळच्या शुद्ध जातीच्या कोंबड्यांचा साठा हे या कंपन्यांचे शक्तिस्थान. शुद्ध जातींची पैदास करण्याचे तंत्र हा कुक्कुटपालन व्यवसायाचा पाया आहे.
 वस्तुस्थिती अशी की, या जातीसुद्धा संकरित आहेत. म्हणजे मुळात १, २, ३, ४ या शुद्ध जाती. १ आणि २ यांच्या संकराने ५ ही जात बनते, तर ३ आणि ४ यांच्यापासून ६ ही जात. ५ आणि ६ यांच्यापासून पैदा होणारी पिल्ले शेतकऱ्यां कडे जातात. बरीच वर्षे आपल्याकडे ५ आणि ६ या जाती आयात केल्या जात.अलीकडे काही कंपन्यांनी १,२,३,४ या मूळ जातीच आयात केल्या आहेत. म्हणजे परदेशांवरचे अवलंबन एक पाऊल मागे गेले आहे. या मूळ शुद्ध जाती´ जोपासणे हे खास तज्ञांचे काम आहे.

 पाळीव प्राणी हे खास फायद्यासाठी जोपासायचे. पण निसर्गात माणसाला उपद्रव देणारे प्राणीही आहेत. रोगजंतू, पिकांवर हल्ला करणारे कीटक, रोगराई पसरणारे कीटक हे सगळे जीव या प्रकारात मोडतात. डास हा तर आपल्याला मोठाच शाप आहे. डासामुळे मलेरियाचा प्रसार होतो आणि मलेरियामुळे आपले आरोग्य कायम धोक्यात येते. लाखो माणसे काम करू शकत नाहीत. मलेरियामुळे कर्नाटकातल्या शिमोगा भागातील जंगलात वस्ती करायला कोणी तयार नसे. डीडीटीच्या बापराने मलेरिया घटल्यानंतर महाराष्ट्रातील गवळी, धनगर आपल्या भुकेल्या

९२ / नराचा नारायण