पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगळे काढण्याचा प्रयत्न केला आहे. अशा एका प्रयोगामधे भट्टाचार्य नावाच्या भारतीय शास्त्रज्ञाने १° सेंटिमेंट इतके गार केलेले वीर्य ग्लिसरीन आणि अंड्याचा बलक या मिश्रणावर सोडले. सुमारे १२ तासांनी तपासणी करता असे आढळून आले की, या मिश्रणाच्या तळापर्यंत पोचलेले शुक्रजंतू बहुतेक x रंगसूत्र प्राप्त झालेले होते. तर वरच्या थरातील वीर्यामधे बरेचसे Y रंगसूत्रधारी शुक्रजंतू होते. अशा तऱ्हेने x रंगसूत्रधारी शुक्रजंतू वेगळे करून वापरले, तर कालवडींचे प्रमाण खूपच वाढेल. दुर्दैवाने हे तंत्र व्यावहारिक पातळीवर आणण्यात अजून विज्ञानाला यश आलेले नाही.
 संकरित गोपैदाशीचे युग येण्यापूर्वीसुद्धा मणिभाई देसाईंसारखी सर्वोदयी मंडळी किंवा काही धार्मिक मठ रुटुखुटु गोशाळा चालवत असत. गांधी, कृष्ण, दत्त या आपल्या दैवतांना गाईबद्दल ममत्व वाटे म्हणून असेल किंवा बैल, दूध, शेण, ( श्रावणीसाठी गोमूत्र ) देणारी माता ( सावरकरांच्या शब्दात 'माता, पण बैलाची ) म्हणून असेल, पण लोक कर्मकांड म्हणून का होईना, गाईची सेवा करत. उलट तेव्हा किंवा आताही कोणी म्हशींबद्दल का बोलत नाही ? म्हशी नाही दूध, शेण देत ? कोकणात रेडेसुद्धा शेतीकामाला जुंपतात. मग या विश्वामित्री सृष्टीतल्या प्राण्या- कडे दुर्लक्ष का ? एकतर म्हशीची अवस्था गायीपेक्षा जास्त बरी आहे आणि होती.म्हशी बरेन्द्र दूध देतात. म्हणून काय झाले? त्या आणखी जास्त दूध द्यायला लागल्या तर ते नको आहे का आपल्याला ? तसे नव्हे. म्हशीचे दूध वाढले तरी हवेच आहे.पण ते कसे होणार ? दूध बनवण्याशी संबंधित जीन्स बदलण्याचे तंत्रज्ञान अजून आपल्याजवळ नाही. म्हणजे कोठूनतरी जास्त दूध देणाऱ्या म्हशी मिळवून त्यांचा स्थानिक जातींशी संकर केला पाहिजे. दुर्दैवाने, आपल्या गाईंपेक्षा दसपट दूध देणाऱ्या गाई जशा युरोपात सापडल्या, तशा आपल्या म्हशींहूनही बहुदुधी म्हशी इतरत्र कुठेच नाहीत. त्यामुळे संकरित पशुपैदास तंत्र त्यांना लागू पडत नाही.

 शेळी ही गरिबाची गाय आहे. थोडक्या पैशात विकत मिळते. शेंबडे पोरसुद्धा तिला हाकून नेऊ शकते. बिचारी कसलाही कडू-गोड पाला खाते. उन्हाळ्यात जमीन फुंकून गवताचे बुडखेसुद्धा उपटून खाते. इकडून तिकडून बांधावरून चार काड्या गोळा करून आणल्या, तरी तिचे भागते. नशीब असेल तर पावशेर अच्छेर दूध देते.

९० / नराचा नारायण