पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीत? कदाचित गाय (आणि कुत्रा ) यांच्या माणसाबरोबरच्या वागणुकीत अशी काही तऱ्हा असतील किंवा चेहरेपट्टीत गुण असतील की, त्यांच्यामुळे आपल्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण होते. हे गुण कदाचित परदेशी गाईमधे नसतील. युरोप, अमेरिकेत गाय हा एक मट्ठ प्राणी मानला जातो. अमेरिकेत स्त्रीला गाय म्हणणे हा मोठाच अपमान होईल. कोंबडी म्हटले तर तितका नाही. असे का ते मला माहीत नाही. प्रदर्शनात एका प्रचंड बैलासमोर ' चार पायांवर उभे असलेले दोन हजार हँबर' अशी पाटी पाहून मी एकदा दचकलो होते. दोनदा पाझरणारा दुधाचा नळ ' असे म्हणणार नाही. दृष्टिकोनाला युरोपीय गाय जबाबदार असण्यापेक्षा, तो आपण गाईला ' दिवसातून कदाचित या उपयुक्ततावादी एकंदर युरोपीय संस्कृतीचा एक भाग असेल. आपल्याकडचे अनेक शेतकरी संकरित किंवा पूर्ण विदेशी गाईंवर देशी गाईंइतकेच प्रेम करतात. काही असो. देशी-विदेशी गाईंचा संकर करताना दोन्हीकडचे चांगले गुण एकत्र यावेत अशीच आपली इच्छा असते. पण आपण फक्त परदेशी ' रक्ताचे ' प्रमाण नियंत्रित करू शकतो. परदेशी वळू आणि देशी गाय यांच्यापासून जन्मलेली कालवड ५०% परदेशी रक्ताची (किंवा जीन्सची ). तिला पुन्हा परदेशी वळूपासून कालवड झाली, तर ती ७५ टक्के परदेशी रक्ताची. गोपैदास करणाऱ्या बऱ्याचजणांच्या मते ६६ टक्के परदेशी रक्त हे प्रमाण सर्वोत्तम आहे.

 संकरित गोपैदाशीत आपल्याला हव्या असतात सगळ्या कालवडी. पण निम्मे खोंड मिळतात. संकरित कालवडी बहुदुधी असल्या, तरी संकरित बैल तितके फायदे- शीर ठरत नाहीत किंवा त्यांची तितकी गरज नाही. संकरित बैल पैदा होऊ नयेत अशी व्यवस्था नाही का करता येणार ? गर्भधारणेच्या पहिल्या अवस्थांमधे नर आणि मादी गर्भाचे प्रमाण विनास दोन असते. पण पुढे नरगर्भाचा जास्त प्रमाणात मृत्यू होऊन, जन्माच्या वेळेपर्यंत हे प्रमाण बरोबरीला येते. असे का ? गर्भाचे लिंग x आणि Y रंगसूत्रे ठरवतात हे आपण पाहिले. Y रंगसूत्र असलेले शुक्रजंतू अंडे फलित करण्यात जास्त यशस्वी का होत असतील? कदाचित मादीच्या योनिमार्गातून अंड्यापर्यंत पोचणे त्यांना जास्त सोपे जात असेल. ४ रंगसूत्र बरेच लहान असल्या- मुळे ते धारण करणारा शुक्रजंतू हलका असतो आणि तो जास्त वेगाने प्रवास करू शकतो. या हलकेपणाचा फायदा घेऊन शास्त्रज्ञांनी ४ रंगसूत्रे असलेले शुक्रजंतू

सुप्रजाजनच / ८९