पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असलेले सर्व गुण आहेत ना, तसेच नको असलेले काही दोष लपलेले नाहीत ना हे तपासणे अत्यावश्यक असते. या तपासणीचा खात्रीशीर मार्ग म्हणजे त्या वळूपासून पैदा झालेली पुढची पिढी कशी वाढते ते पाहणे (प्रोजनी टेस्टिंग ). एखादी दुसरी कालवड पाहून भागत नाही. कारण ती योगायोगाने गुणी निधू शकते. बऱ्याच कालवडी पैदा होणार. त्या मोठ्या होणार. मग तो बैल किती चांगला ते ठरणार. यात चार-पाच वर्षे म्हणजे त्या बैलाच्या एकूण उपयुक्त कालापैकी अर्धा जातो. एकदा चळू पसंत झाला की, मग नियमितपणे त्याचे वीर्य काढून गोठवून ठेवता येते. ते गरजेप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतरही वापरता येते. आज भारतात सरकारी पशुपालन, दुग्धविकास ही खाती, तसेच मणिभाई देसाईंच्या भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान- सारख्या सहकारी व समाजसेवी संघटना अशा प्रकारे गाईंच्या सुप्रजाजननाचे प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर काही भागांत तरी दुधाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणावर वाढले आहे.
 गाईंचे दूध मोठ्या प्रमाणावर विक्रीस आल्यावर काही अडचणी दिसू लागल्या आहेत. गाईंच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा निम्मे ( ४ टक्के ) लोणी असते. त्याचा रंग आणि स्वाद अनेकांना आवडत नाही. गाईच्या दुधाला म्हशीच्या दुधाइतकी मागणी नाही. याचे मुख्य कारण म्हणजे दुधाचा उत्पादन खर्च भागून शेतकऱ्याला नफा सुटेल अशा भावात भरपूर दूध घेण्याइतकी क्रयशक्ती जनतेजवळ नाही. दुधाचे भाव उतरायला हवे असतील, तर मुख्यतः पशुखाद्य स्वस्त झाले पाहिजे. गवत, चारा, झाडपाला पैदा करणाऱ्या जमिनींची उत्पादकता वाढली पाहिजे. असो.

 भारतीय गाय हळू वाढणारी, कमी दूध देणारी, उशिरा माजावर येणारी असली, तरी ती भारतीय परिस्थितीत तगली आहे. म्हणजे तिच्यात काही अंशी तरी अनुरूपता असणारच. ती उपासमारीला तोंड देऊ शकते. इथल्या वातावरणात असणाऱ्या रोग- जंतूंचा प्रतिकार करण्याची शक्ती तिच्याजवळ आहे. इथल्या तपमानाचा तिला त्रास होत नाही. शिवाय माणसाबरोबर तिने काही प्रमाणात तरी परस्पर आदराचे संबंध निर्माण केले आहेत. आपल्या मनात गाईची प्रतिमा ही एक पुष्कळ समज असलेला, कनवाळू प्राणी अशी आहे. यात धार्मिक भाबडेपणा असेलही. पण काही अंशी 'अनुभवही आला असेल. एरवी कोंबडी, बदक, गाढव यांच्याबद्दल अशा समजुती का

८८ / नराचा नारायण