पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

. पावसाचे पाणी मुरून राहाते, हवा शुद्ध होते. तेव्हा कोणतेच जंगल उधळून टाकता येणार नाही. काहींच्या मते वनखाते फक्त जंगल सफाचट करण्यात कार्यक्षम आहे. पण नवी लागवड करण्यात त्यांना यश येत नाही. अशा लागवडीत बालतरूंचे मृत्यू फार होतात, झाडांची जोमाने वाढ होत नाही आणि अपेक्षेप्रमाणे लाकूड हाती लागत नाही. शिवाय बहुविध जातींच्या वृक्षवल्लींऐवजी एकजातीय लागवड (मोनो कल्चर ) करण्यात अनेक धोके आहेत. रोग पडल्यामुळे, स्थानिक माती वा हवामान अनुकूल न ठरल्यामुळे वा अन्य कारणांमुळे अशी लागवड बरेचदा अपयशी ठरते. शिवाय वनस्पतीसृष्टीतील विविधता टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. जंगलात अनेक वृक्षवल्ली अशा आहेत की, त्यांचा उपयोग आज आपल्याला माहीत नाही. उद्या त्यांची गरज पडेल तेव्हा त्या शोधता येतील. पण त्या जाती नष्ट झाल्या, तर गरजेच्या वेळी हवे तसे गुणधर्म असलेली वनस्पती बनवणे महाकर्म कठीण आहे.
 जंगलखात्याचा युक्तिवाद असा की, शेतीत नाही का आपण मोनोकल्चर करत तिथेही रोग पडतात. पण म्हणून आपण शेती थांबवतो का ? हे बरोबर आहे. पण शेतीमचे आपली हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यातली तंत्रे आपण जाणतो. ती पिके फक्त वर्ष-सहा महिन्यांचीच असतात. फटका खाल्ला तरी लगेच पर्यायी प्रयत्न करता येतात. पिकाची जोपासना, राखण यात शेतकरी निपुण आहेत. ही परंपरा, हे कौशल्य जंगलखात्याजवळ नाही आणि शेतीमधेही जातींची विविधता (जीनपूल डायव्हर्सिटी) जोपासावी आणि राखावीच लागते. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियात खोडकिडयाच्या एका जातीने भातशेतीत थैमान घातले. पिकांची वाताहत होऊ लागली. मग शेतीतज्ञ या किड्याला तोंड देऊ शकेल अशा भाताच्या जातीचा जगभर शोध घेऊ लागले. शेवटी केरळातली एक पारंपरिक जात कामाला आली. तात्पर्य, हवे ते गुणधर्म असलेली वनस्पती जंगलात किंवा इतरत्र सापडली, तर तिचा आपल्या उपयोगी वन- स्पतीशी संकर करणे काही वेळा शक्य होते. पण मुळात तो गुणधर्म निसर्गात कुठे- तरी भस्तित्वात हवा. जंगलातील वनस्पतीसृष्टीची विविधता ही उत्क्रांतीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या गुणधर्मांची, जीन्सची बँक आहे. तिला वरकड म्हणणे योग्य नव्हे.

 माणसाच्या अर्थव्यवस्थेमधे वनस्पतींइतकेच महत्त्व पाळीव प्राण्यांना आहे. दूध,

८६ / नराचा नारायण