पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाकायला निघालो आहोत. जंगलामधले पारंपरिक किमती झाड म्हणजे सागवान, तीनशे वर्षांपूर्वी कान्होजी आंग्रे यांनी आरमारासाठी रत्नागिरी जिल्ह्यांत सागवनाची लागवड केली. शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी केरळच्या त्रिचूर जिल्ह्यातील नीलांबूर भागात सागवानाची कृत्रिम लागवड केली. आज जंगलखाती आणि वनविकास महामंडळे प्रांतोप्रांती तेच करत आहेत. पण दरम्यान कागद, रेयॉन, काड्यापेट्या वगैरे उद्योगां साठी इतर प्रकारच्या लाकडाची गरजही खूप वाढते आहे. त्यामुळे बांबू, निलगिरी, पाइन वगैरे झाडांनाही मागणी आहे. त्यांची लागवड करण्याचे प्रयत्नही चालू आहेत.

 या प्रयत्नांमुळे वनविकासाच्या दिशेविषयी मोठाच वाद निर्माण झाला आहे. एका बाजूला जंगलखाते आणि जंगलावर आधारित उद्योगांचे हितसंबंधित, दुसऱ्या बाजूला वनवासी, आदिवासी आणि त्यांचे कैवारी, तसेच निसर्ग संवर्धन यांचा आग्रह धरणारे वैज्ञानिक समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत असे हे कुरुक्षेत्र आहे. हा अर्थात दृष्टिकोनांचा आणि हितसंबंधांचा झगडा आहे. अगदी संक्षेपात बोलायचे झाले तर कोणत्या वृक्षांना किती महत्त्व द्यायचे यावर फारच दुमत आहे. व्यापारी महत्त्व नसलेल्या झाडोयाला जंगलखाते मिस्लेनिअस फॉरेस्ट किंवा वरकड जंगळ असा शब्दप्रयोग करते. तो इतरांना तुच्छतादर्शक वाटतो. असे जंगल सफाचट ( क्लिअर फेल ) करून त्याजागी साग, निलगिरी, पाइन वगैरे लावण्याचा जंगलखात्याचा उद्देश असतो. आदिवासींना हे मान्य नाही. जंगले त्यांच्या जीवनाचा आधार आहेत. खायला फळे, पाने, फुले, मुळे, शिकारीला प्राणी आणि पक्षी, जळणाला लाकूड, पाळीच प्राण्यांना चारा, रक्षणासाठी काटे, घरासाठी, अवजारांसाठी वासे, अशा नाना गोष्टी त्यांना जंगलांपासून मिळतात. अनेक झाडांची दैवतासारखी पूजा होते. बिहारमधे सालवृक्ष या प्रकारात मोडतो. वनविकास महामंडळाचे उद्योग म्हणजे आदिवासींना परंपरांचा अधिक्षेप आणि आपल्या पोटावर पाय वाटतो. साळवृक्ष तोड झाल्यावर सिंगभूमचे आदिवासी पेटून उठले. त्या जागी लावलेली सागाची रोपे त्यांनी उपटून टाकली. वनविकास कार्यक्रमांच्या विरोधी मंडळींना वाटते की, बरकड़ जंगले फार महत्त्वाची आहेत. पैसा मिळवण्यासाठी ती साफ करता कामा नयेत. इकॉलॉजीवाले किंवा परिसर संरक्षण - निसर्ग संवर्धन चाहणारे म्हणतात की, जंगलांमुळे मातीची धूप थांबते,

सुप्रजाजनन / ८५