पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाणात पिकवला जातो.
 वनस्पतीतील वंध्यत्व घालवणारे, रंगसूत्रांची पटीने वाढ करणारे तंत्र ( पॉलि- प्लॉइडी) प्राण्यांमधे मात्र अपवादात्मक दिसते, आणि अपायकारक मानले जाते. ती कदाचित कॅन्सरची सुरुवात असू शकते. या संदर्भात सुमारे दहा वर्षांपूर्वी भारताच्या विज्ञानविश्वात एक चाद निर्माण झाला. भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरच्या तज्ञांनी कल्पना मांडली की, अन्नधान्य टिकवण्याकरता त्यावर गॅमा किरणांचा मारा करावा. त्यामुळे साठवलेल्या धान्याची खराबी कमी होईल. आपल्याकडे उत्तम गोदामे बांधण्या- करता पुरेसे भांडवल उपलब्ध नाही. तेव्हा एखाद्या स्वस्त प्रक्रियेने जर धान्याचा नाश थांबवता येत असेल, तर ते स्वागतार्हच आहे. लिंबाचा पाला, पायाच्या गोळ्या, बोरिक पावडर यांसारखे पदार्थ वर्षाचे धान्य साठवण्याकरता घरगुती वापरात आहेतच. पण धान्य महामंडळासारख्या ( फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) लक्षावधी टन धान्य साठवणाऱ्या संस्थेच्या दृष्टीने तोकडे आणि गैरसोयीचे ठरतात. म्हणून गॅमा किरणांचा वापर विचारात घेण्यासारखा होता. केंद्रीय आरोग्यखात्याने ही कल्पना हैद्राबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनला कळवली. तिचा अभ्यास करून दिलेल्या अहवालात या संस्थेच्या तज्ज्ञांनी म्हटले की, गॅमा किरणांचा मारा केलेले धान्य खाऊ घातलेल्या उंदरांमधे पॉलिप्लॉइड पेशींचा प्रादुर्भाव आढळला. मग या दोन बडघा संस्थांची आपसात टकराटकरी सुरू झाली. भाभा अणुशक्ती केंद्राच्या मते हैद्राबाद- करांनी नीट प्रयोग केले नाहीत. अडचण अशी की पॉलिप्लॉईडपेशी निरोगी उंदरातही artist प्रमाणात का होईना पण असू शकतात. त्या प्रमाणामधे होणारा फरकही अतिसूक्ष्मच असतो. ही सूक्ष्मात जाऊन करण्याची मोजणी निर्दोष कशी बल हे सांगणे सोपे नाही. शेवटी आरोग्यखात्याने प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नाचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीच्या मते हैद्राबादकरांनी केलेल्या प्रयोगात उंदरांच्या पेशींचे नमुने घेण्याची जी पद्धत वापरली, तिच्यात संख्याशास्त्राच्या दृष्टीने काही उणिवा होत्या.

 गॅमा किरण वापरून अन्नधान्यावर प्रक्रिया करावी का नाही हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पण पॉलिप्लॉइड पेशींमुळे गव्हाच्या चांगल्या जाती घडल्या ही जशी एक बाजू, तशी पॉलिप्लॉइड पेशी नेहमीचा स्वागतार्ह नसतात ही दुसरी बाजू

सुप्रजाजनन / ८३