पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुन्हा मातीत बुरशी मिसळायची. असा उद्योग अनेक हंगाम करत राहायचे. मग हातात उरते ते बुरशीला भरोश्याने टक्कर देणारे बी. असे सोन्यासारखे बी घडायला दहा दहा वर्षे लागतात. त्यामुळे ते बियाणे वापरण्यासाठी सोन्याच्या मोलाने पैसे द्यावे लागतात. पण बरेचदा या बियाण्यात वरवर दिसण्यापुरता तरी काहीच वेगळे- पणा नसतो. त्याचा वेगळेपणा कळतो तो रोग पडल्यावर. त्यामुळे समाजकंटकांच्या तोंडाला पाणी सुटते. पैशाला पासरी मिळणारी सरकी ख़ास वाण म्हणून दसपट भावात विकली जाते. अर्थात हा प्रकार हायब्रीडमधे जास्त प्रमाणात होतो. हायब्रीड - मधे बांधा असा की, पेरलेले उगवल्यावर तेच पुन्हा पेरता येतं नाही. कारण पुन्हा पेरले तर काय उगवेल याचा काहीच भरोसा नाही. शाळू पेरला, मळणी झाली की, त्यातले चांगले दाणे पुन्हा पेरायचे. आंबेमोहोर किंवा रायभोग तांदूळ पेरला, पीक घेतले की बियाणे तयार. कारण या सगळ्या तथाकथित ट्रु ब्रीडिंग जाती आहेत. पण अशा जातींच्या उपयुक्तेला मर्यादा पंडते. ती मर्यादा ओलांडण्याकरता हायब्रीड किंवा संकरित वाणांचे तंत्र उपयोगी पडते.

 अगदी थोडक्यात सांगायचे तर हायब्रीड तंत्रामधे एका जातीचे परागकण दुसऱ्या जातीच्या स्त्रीकेसरांवर टाकून फलधारणा घडवायची. यामुळे दोन्ही जातीतील डॉमिनंट जीन्स एकत्र येतात. असे बी वापरून त्या डॉमिनंट जीन्सचा उपयोग करून घेता येतो, कारण F1 पिढीमधे सर्व डॉमिनंट जीन्सचा प्रभाव दिसतो. पण एकदा पीक घेऊन आलेले दाणे पुन्हा पेरले, तर उगवणान्या F2 पिढीच्या रोपांमधे, आधींच्या पिढीत लपलेल्या रिसेसिव्ह जीन्स डोके वर काढतात, काही रोपे या तर काही त्या प्रकारची होतात. म्हणून आलेल्या पिकाचे दाणे बी म्हणून वापरता येत नाहीत. बियाणे निर्माण करण्याचा वेगळाच व्यवसाय सुरू करावा लागतो. त्यासाठी मूळच्या दोन जाती वेगवेगळ्या लावायच्या. मग त्या फुलावर आल्या की, एका जातीतले पुंकेसर खुडून टाकायचे आणि दुसऱ्या जातीचे पुंकेसर आणून पहिलीच्या फुलांवर टाकायचे. असा संकर झाल्यावर ते फूल झाकून टाकायचे. म्हणजे कुठलेतरीच परागकण येऊन गडबड करत नाहीत. ही मोठीच जिकिरीची प्रक्रिया आहे. तिला माणूसबळ फार लागते. शेतकन्याला तांत्रिक बारकाव्यांची जाण लागते. शापल्याकडे हायब्रीड बियाणे शेतकन्यांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी बऱ्याच अंशी सरकार

सुप्रजाजनन / ८१