पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनोगत


    १९८२ साली ब्रिटिश वैज्ञानिक चार्लस डार्विन ( १२ फेब्रुआरी १८०९ ते १९ एप्रिल१८८२ ) याच्या मृत्यूला शंभर वर्षे झाली. त्यानिमित्ताने डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतावर बरीच चर्चा झाली. तसे पाहिले तर माझ्या पिढीला शाळेच्या पाठ्यपुस्तकातून डार्विनच्या विचारांची ढोबळ ओळख झालेली आहे. माकड हा माणसाचा पूर्वज आहे असे काहीतरी धूसरपणे बऱ्याच जणांना आठवते. खरे तर डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पीशीज' या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या सहाशे पानी पुस्तकात ही बाब अगदी ओझरती आली आहे. पण नेमकी तीच माणसांना फार बोचली. डार्विनच्या मांडणीविरुद्ध त्यावेळी टीकेचे मोठे वादळ उठले.
एका मतानुसार केप्लर, डार्विन आणि पॉइड या तीन शास्त्रज्ञांना विज्ञानाच्या इतिहासात फार महत्त्वाचे स्थान आहे. या तिघांच्याही शोधामुळे मानवजातीच्या अहंकाराच्या ठिकन्या उडाल्या. विश्वाचे केंद्रस्थान म्हणजे पृथ्वी. तिच्यावरील जीवसृष्टीमध्ये अग्रस्थानी असलेला, परमेश्वराच्या जणू प्रतिचिंबातूनच घडलेला तो मानव ! बाकी इतर अनेक बाबतीत प्राण्यांहून दुबळा असूनही विवेक आणि विचारशक्ती यांच्या जोरावर सर्वांवर सत्ता गाजवणारा. इतर जीव निसर्गदत्त नियमानुसार जन्मापासून मरणापर्यंत वाटचाल करणारे तर मानव आपल्या मनोसामर्थ्याने विश्वामित्री सृष्टी कल्पिणार आणि घडवणार. असा हा अहंकार होता.
केप्लरने असे सिद्ध केले की, पृथ्वी केंद्रस्थानी नसून सूर्य आहे. डार्विन म्हणाला, माणूस ईश्वराच्या प्रतिमेसारखा नव्हे तर माकडाच्या प्रतिमेसारखा आहे. फॉइड म्हणाला की, मानवाच्या व्यवहारामधे विचारपूर्वक केलेल्या कृतीपेक्षा अंतर्मनाच्या हुकुमाने केलेल्या गोष्टीच बव्हंश आहेत. म्हणूनच की काय या तिबांनाही आपापल्या काळात प्रखर टीकेच्या आणि विरोधाच्या अग्निदिन्यातून जावे लागले.

आजही डार्विनच्या सिद्धांतांना होणारा विरोध पूर्णपणे संपलेला नाही. उत्तर अमेरिकेत खिस्ती धर्मगुरूंचा एक मोठा गट बायबलच्या आधारावर डार्विनला खोटा पाहू पाहत..आहे. त्याचबरोबर डार्विनचा उत्क्रांतिवादही सतत बदलतो आहे, विकसित होतो आहे.

अकरा