पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण सहावे


सुप्रजाजनन


 डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत हा शेसव्वाशे वर्षांपूर्वीचा. परंतु मानवाने फार पूर्वीपासून स्वार्थाकरता जाणीवपूर्वक अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या जीवनात उत्क्रांती घडवून आणली. प्रथम जंगली प्राण्यांचे पाळीव प्राणी बनवले. घोडा, गाय, कोंबडी, बकरी, उंट, मधमाशी, रेशीम किडा ही सर्व मंडळी माणसाच्या सहवासात रमली. त्यांच्यापासून अन्न-वस्त्र मिळवताना त्यांना अनुकूल अशा जागा शोधत माणूस हिंडू लागला, भटक्या झाला. पशुपालनावर जगणाऱ्या जमाती आजही आपल्या समाजात आहेत. मेंढपाळ धनगर, गाई-म्हशी पाळणारे गवळी-धनगर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. मेंढपाळ - धनगरांना कुरणाच्या शोधात वर्षभर एका मुलखातून दुसन्यात जावे लागते. त्यामुळे त्यांची प्रदेशाची जाण इतर कोणाहीपेक्षा सखोल बनते. मुंबई-पुण्याला जोडणारा बोरघाट मार्ग इंग्रज साहेबाने धनगरांच्या मदतीने शोधला असे म्हणतात. मेंढ्यांचे ठीक आहे. पण बदकांचे तांडे घेऊन गावोगाव

७० / नराचा नारायण